सहकारी बँकिंग क्षेत्र मजबूत करणारी विश्वास आणि प्रगतीची ७५ वर्षे!

पुणे-केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत ‘जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे’च्या बँकिंग सेवेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज पुणे येथे संपन्न झाला.
जनता सहकारी बँकेचा ७५ वर्षांचा प्रवास सहकारी बँकिंग मजबूत करणारा, आर्थिक समावेशनाला चालना देणारा, लघु व्यवसायांना सक्षम करणारा आणि सहकारी मूल्यांचे समर्थन करताना आधुनिक नवोपक्रमांना प्रोत्साहित करणारा राहिला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे’ यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आ. बाबासाहेब पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.