इतर

अगस्ती’च्या बाल चिमुरड्यांनी जिंकली अकोलेकरांची मने

अकोले– येथील अगस्ती विद्यालयाची खास आकर्षण असलेली , नेहेमीच अकोलेकरांच्या डोळ्यांची पारणे फेडणारी, शिस्तबद्ध पद्धतीने विविध प्रकारच्या कार्यक्रमांची पर्वणी श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक थोर स्वातंत्र सेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांच्या प्रेरणेतून गेल्या 58 वर्षांपासून चालु असलेल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

अगस्ती’ विद्यालयाच्या बाल चिमुरड्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत अकोलेकरांची मने जिंकली व वाहवा मिळवली. अगस्ती विद्यालयातील श्री गणेशाच्या 58 व्या विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत अकोलेकरांची मने सुखावली असल्याचे चित्र दिसत होते.

बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत विद्यालयातील तब्बल 764 विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करत आपला सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या 75 मुलींच्या ढोल पथकाने ढोल ताशा वादनाचे प्रात्यक्षिक अकोलेकरांसाठी पर्वणीच ठरली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम, झांज , टिपरी , गणेशवंदना, दिंडी , मंगळागौर, झेंडा , आदिवासी नृत्य,लाठी काठी यांचे सादरीकरण केले.

विसर्जन मिरवणुकीत शिक्षक सौरव पोखरकर यांनी साई बाबा यांचे सादरीकरण केले .या मिरवणुकीत चांद्रयान प्रतिकृती चे खास आकर्षण राहिले .व विद्यालयातील शिक्षकांचा लेझिम हा अकोलेकरांसाठी कौतुकाचा विषय ठरला. संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांनी 1966 पासून घालून दिलेली परंपरा आजही कायम असून बाबा वयाच्या 82 व्या वयापर्यंत स्वतः विसर्जन मिरवणुकीत लाठीकाठी , चक्र , टेंभा आदी प्रात्यक्षिके सादर करत असत व म्हणून विद्यालयाची गणेशोत्सव मिरवणूक हे एक विशेष आकर्षणाचे केंद्रस्थानी राहिलेले आहे .

विद्यालयात सकाळी अकोले तालुक्याचे भूमिपुत्र व विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध चित्रपट निर्माते मछिंद्र धुमाळ यांचे हस्ते सपत्नीक श्रीच्या आरतीने विसर्जन मिरवणूकीचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे, तहसीलदार सतीश थिटे, पोलीस निरीक्षक विजय करे, मंडळ अधिकारी बाबासाहेब दातखिळे, अगस्ती एज्युकेशनच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेश नवले, जेष्ठ पत्रकार विजय पोखरकर, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, शिवसेना तालुका प्रमुख डॉ मनोज मोरे, मनसे तालुका प्रमुख दत्ता नवले, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ, उपमुख्याध्यपिका सुजल गात, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर, संजय शिंदे, आदी उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम पाहण्यासाठी ठक्कर कॉम्प्लेक्स, व अकोले नगरपंचायत येथे अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नगरपंचायतीच्या वतीने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button