ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचा माणुसकी सेवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
नाशिक येथे रामलीला बॅक्वेट हाॅल, जत्रा हाॅटेल या ठिकाणी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती चा आज चौथ्या वर्धापन दिनानिमित्त” राज्य स्तरीय ग्राहक हक्क संरक्षण जनजागृती अभियान मेळावा व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा”
मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, उद्घाटक उत्तम कांबळे ,जेष्ठ साहित्यिक त्याच प्रमाणे प्रमुख अतिथी आमदार सुधीर ताबे साहेब. न्यायाधीश सचिन शिंपी सर अध्यक्ष नागपूर ग्राहक आयोग.माजी.न्यायाधीश अशोक आव्हाड,डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव, प्रा.डाॅ.साहेबराव निकम राष्ट्रीय प्रवक्ता ,अॅड.प्रेरणा कुलकर्णी माजी. सदस्य नाशिक ,ग्राहक आयोग.अॅड.महेश ढाके माजी, सदस्य ग्राहक आयोगअहिल्यानगर,अॅड.हेमतभंगाळे.जळगाव,अॅड.कल्याणी कदम, मनिष सानप, सह आयुक्त अन्न प्रशासन नाशिक,एस .एम. सांगळे उपनियंत्रक वजन मापे नाशिक ,महादेव मस्के राज्य अध्यक्ष, संजय काळे, अध्यक्ष सुकदेव एज्युकेशन सोसायटी,या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम दिपप्रज्वलन करुन नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .ग्राहक जनजागृती अभियान मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ९४ समाजसुधारकाचा” राष्ट्रीय पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले जीवन गौरव पुरस्कार श्री रत्नाकर साळवे भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक व .श्री दौलत मोगल निकम व सौ लक्ष्मीबाई दौलत निकम यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान जय मल्हार न्यूज चे उपसंपादक माझे मित्र श्री. रमेश गिरी यांना उत्कृष्ट पत्रकार सन्मानित करण्यात आले यावेळी. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव , डॉ.साहेबराव निकम, राष्ट्रीय प्रवक्ता व मार्गदर्शक , सौ रोहिणी जाधव ,राष्ट्रीय उपाध्यक्ष, , डॉ. अर्चना झोटिंग , राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच या यशामागे समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हातभार लावून परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. त्यात डाॅ.प्रविणकुमार चव्हाण ,राष्ट्रीय मार्गदर्शक .श्री.सचिन पवार, राष्ट्रीय संघटक,सौ.जान्हवी पाटील,राष्ट्रीय सदस्य, श्री महादेव म्हस्के, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ,योगेश निकम, राज्य संपर्क प्रमुख, प्रा.शिवलाल पगार , कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, श्री.प्रकाश बोराडे , उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र,प्रा.निलेश दुसे ,

नाशिक जिल्हा मार्गदर्शक, आर्कि.अक्षय कोठावदे,जिल्हाध्यक्ष नाशिक.
श्री.महेंद्रशेठ बेदमुथा , जिल्हाध्यक्ष व्यापारी विभाग ,सौ.नम्रता कायस्थ , जिल्हाध्यक्षा, नाशिक. सौ.वर्षा बोरसे , जिल्हाध्यक्षा, नाशिक.ग्रामीण, अॅड.ललिता सावंत , मुंबई ,शहर अध्यक्षा, श्री.स्वप्निल जाधव , जिल्हाध्यक्ष, मिडिया विभाग नाशिक, ग्रामीण,सौ.मंजिरी पाटे ,कार्याध्यक्षा ,नाशिक, सौ.धनश्री शेळके, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, श्रीजित वारियर.नाशिक जिल्हा,
उपाध्यक्ष,सौ.ललिता पवार नाशिक जिल्हा संघटक, सौ.सोनिया कराळेकर,नाशिक शहर संघटक आदि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. अध्यक्षीय भाषण मा.दादाभाऊ केदारे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ .साहेबराव निकम, आभार प्रदर्शन डॉ.प्रवीण कुमार चव्हाण यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.