मच्छींद्र मंडलीक यांची मॉडर्न हायस्कूलच्या शाळा समितीवर सदस्य पदी निवड.

अकोेले (प्रतिनिधी) अकोले येथील हिंद सेवा मंडळ संचलित -मॉडर्न हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, सोमचंद्र शहा कॉमर्स अँड भास्करराव कदम (गुरुजी) सायन्स, अकोले- शाळा व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून मच्छींद्र त्र्यंबक मंडलीक यांची निवड झाली
. मंडलीक यांचे शैक्षणिक व सामाजिक, योगदान महत्वाचे आहे. त्याच बरोबर जिल्हयात व तालुक्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागले व करीत आहे. तालुक्यात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून १५ ते २० वर्षापासून सातत्याने ग्रंथालय व ग्राहक चळवळीचे काम महत्त्वपूर्ण करीत आहे.तसेच त्यांच्या कामाची दखल घेऊ घेऊन त्यांची निवड झाली.
त्यांच्या निवडी बद्दल कॉलेजचे प्राचार्य संतोष कचरे (सर), प्रा. दिपक जोंधळे, स्कूल कमिटीचे सतिश शेट बूब, दिलीप शहा, संस्थेचे सेवक प्रतिनिधी योगेश देशमुख, मा. आ. वैभवराव पिचड, सिताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, मा. उपप्राचार्य
सुनिल शिंदे, रमेश राक्षे,महेश नवले, अँड दिपक शेटे, अँड राम भांगरे,कवी ज्ञानेश पुंडे, दत्ता शेनकर, भाऊसाहेब वाळुंज, खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे, दत्ता ताजणे, सुरेश गायकवाड, धनंजय संत, सचिन जोशी, नगराअध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपानगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, रामहारी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, सुदाम मंडलीक, रामदास पांडे, राजेंद्र घायवट, कैलास तळेकर, सुदिन माने आदिंनी अभिनंदन केले.