काष्टीत बबनराव पाचपुते स्व सदाशिवराव पाचपुते यांच्या सुपुत्रांची आमने सामने लक्षवेधी लढत!
अंकुश तुपे
श्रीगोंदा प्रतिनिधी:
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आसुन राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आमदार बबनराव पाचपुते यांचे घरात फूट पडल्याने जिल्ह्याचे लक्ष काष्टी कडे लागले आहे.
सरपंच पदासाठी आमदार पाचपुते यांचा मुलगा प्रताप तर स्वर्गीय सदाशिवराव पाचपुते यांचा मुलगा साजन हे दोघे आमनेसामने उभे ठाकले असुन डॉ.अनिल कोकाटे हे अपक्ष उमेदवार आसल्याने या तिरंगी लढतीत मतदार मात्र प्रतिक्रिया देत नाहीत त्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज छातीठोकपणे सांगता येत नाही.
येथील सरपंच पद ओबीसी साठी राखीव आहे. भाजपा आणि काँग्रेस ने ओबीसी समाजाला संधी देण्याऐवजी घरातील चुलत भाऊ निवडणूक लढवत असल्याने ही लुटुपूटू लढाई सुरू असल्याचे डॉ.अनिल कोकाटे सांगत असुन मतदारांनी विकासासाठी आपणास विजयी करण्याचे आवाहन केले .
काष्टी गाव विकासापासून वंचीत असुन अनेक विकासकामे प्रलंबित आहेत अशी टिका करत आपण सरपंच पदाच्या माध्यमातून विकासकामे करू गावकऱ्यांना बरोबर घेऊन काष्टी हायटेक करू असे सांगून काँग्रेस आणि भाजपने ओबीसी उमेदवारी देण्याची गरज होती मात्र तसे घडले नाही आपण मात्र सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आपण निवडणुकीत उतरलो असून प्रचारा दरम्यान नागरिकांचा आशीर्वाद मिळत असुन काष्टी गावाच्या विकासाबाबत डॉ.अनिल
कोकाटे म्हणाले बसस्थानक, बगीचा,उद्योग वाढीसाठी योजना,पारदर्शक कारभार,सामान्य माणसाला कारभारात सहभागी होता येईल अशा पध्दतीने काम करण्यासाठी आपली उमेदवारी आहे आरक्षण देखील ओबीसी साठी आहे त्यांना सत्तेत सहभागी होता आले पाहिजे म्हणून आपण माघार न घेता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला माझी उमेदवारी सत्तेसाठी नसून सत्यासाठी आहे आणि आपल्या भूमिकेवर सामान्य काष्टीकर समर्थन देत आहेत .राजकारण्यांनी आपलेच लोक पुढे करून लुटुपटू ची लढाई सुरू केली त्याला आपण अपवाद ठरलो अशी प्रतिक्रिया डॉ.कोकाटे यांनी प्रतिनिधी शी बोलताना दिली.