इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०७/०३/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फल्गुन १६ शके १९४६
दिनांक :- ०७/०३/२०२५,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३६,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति ०९:१९,
नक्षत्र :- मृग समाप्ति २३:३२,
योग :- प्रीति समाप्ति १८:१४,
करण :- बालव समाप्ति २०:४४,
चंद्र राशि :- वृषभ,(११:४५नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – पू. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ११:११ ते १२:४० पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:१४ ते ०९:४३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:४३ ते ११:११ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:४० ते ०२:०९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
दुर्गाष्टमी, दग्ध ०९:१९ प., नवमी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १६ शके १९४६
दिनांक = ०७/०२/२०२५
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल. दानाचे महत्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

वृषभ
प्रवासात सतर्क राहावे. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल.

मिथुन
जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. उगाचच विरोध करणे टाळावे. वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल.

कर्क
पोटाचे त्रास संभवतात. फार तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.

सिंह
स्वत:च हेका गाजवाल. मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे. चर्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.

कन्या
कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे.

तूळ
मानसिक संवेदनशीलता दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे. मनात काहीशी भीती लागून राहील. नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल.

वृश्चिक
घरगुती प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शा‍ब्दिक चकमक टाळावी.

धनू
मानसिक चलबिचलता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा.

मकर
शांत व संयमी विचार करावा. लोकनिंदेला बळी पडू नका. जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

कुंभ
मित्रांशी मतभेद संभवतात. कसलाही वाद वाढू देवू नका. बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल. वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा.

मीन
कामाचा व्याप लक्षात घ्यावा. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा. वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा. कागदपत्रे तपासून घ्यावीत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button