बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग आमरण उपोषण करणार
प्रविण भिसे
शेवगाव– प्रहार संघटनेचे प्रमुख तथा दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ समाधी पाचाड स्थळाजवळ दिनांक 21, 22 व 23 मार्च रोजी तीन दिवसीय आंदोलन होणार आहे.
▪️ दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा
▪️ दिव्यांगांना घरकुल मिळावे
▪️ दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे
या प्रमुख मागण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग आमरण उपोषण करणार असून रक्तदान आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे..
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे महायुती सरकार सत्तेवर आले आहे त्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पायथ्याशी आंदोलन केले जाईल.
आंदोलनाला येणाऱ्या सर्व दिव्यांगांनी 21, 22 व 23 मार्च असे तीन दिवस आपल्याला सहभाग घ्यायचा आहे याच तयारीने यायचे आहे.
दिव्यांग बांधवाच्या एकजूटी साठी व बच्चू भाउच्या विचाराला बळकट करण्यासाठी हजारोच्या संखेणे उपस्थित राहावे हि नम्र विनंती
शेवगाव तालूका अध्यक्ष- ?श्री रामजी पा शिदोरे