अन्यथा शेतरस्त्यांसाठी आझाद मैदानावर उतरणार -शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पारनेर -राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नाकारू शकत आज
शेतरस्त्यांअभावी शेती बंद होण्याची वेळ राज्यात निर्माण झाली असून ग्रामीण भागातील तुटलेती मने जोडण्यासाठी प्रगतीचा महामार्ग खुला करण्यासाठी गाव खेड्यातून शेतीचा श्वास खुला करण्यासाठी समृद्ध शेतकरी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी ग्राम तहसिल जिल्हा प्रशासनासह न्यायालयीन संघर्षातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी जनजागृती जनआंदोलन करत महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ सरकार प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे
यातच राज्याचे मुख्यमंत्री, महसुलमंत्री,उपमुख्यमंत्री यांना शेतरस्ता आंदोलनातील मागण्यांसंदर्भातीत निवेदन मंत्रालयावर राज्याचे महमुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाचे स्वीय सहायक सचिव प्रविण महाजन यांची महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांसमवेत मंत्रालयावर चळवळीच्या मुद्द्यांना शासन निर्णयात घेण्यासंदर्भात बैठक पार पडली
यावेळी राज्यातील सर्व तहसिल,प्रांत कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस, गावनकाशावरील शेतरस्तांच्या हद्द निश्चित विहीत मुदतीतत करून लांबी रुंदी नकाशावर घ्यावी,वहिवाटीच्या रस्त्यांना गाव नकाशावर घेणे, वाटप पत्रात रस्ता असल्याशिवाय वाटपत्र करू नये,सर्व नायब तहसिलदार, मंडल अधिकारी यांना पोलिस यंत्रणेसह स्वतंत्र रस्ते खुले करण्याचे आदेश द्यावेत,राज्यातील सर्व तहसिल जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वतंत्र रस्तादिन सुरू करावेत,प्रशासकीय कार्यालयांना आलेल्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करणे,शिव पानंद शेतरस्तांना नंबरी लावून नंबरींचे कालावधीत सर्वेक्षण करावे नंबरी हटविणारांविरोध गुन्हा दाखल करणे आदी मागण्यांवर निवेदन स्वीकारत आदी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी निवेदनात नमूद केल्या प्रमाणे प्रत्यक्ष महसुलचा शासननिर्णय बनवून दर्जेदार शेतरस्त्यांसाठी सामाजिक स्वास्थ्यासाठी कायदा करून अंमलबजावणी करावी अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर दि.२१एप्रिलला धरणे आंदोलन २२ एप्रिलला एक लाक्षणिक उपोषण करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वय दादासाहेब जंगले पाटील यांनी निवेदन देत राज्यसरकारला आंदोलनाचा ईशारा दिला.