डॉ. पोपेरे यांना’राजा राममोहन राय’ पुरस्कार

अकोले : देशभरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तींना राजा राममोहन राय राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील बदलापूर (जि. ठाणे) येथील डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम INDIA Government NITI Aayog
आणि Zenth Book of World Record यांच्या सहकार्यान मिशन विश्वगुरू भारत, कोलकत्ता राज्य यांच्या मोठ्या उत्साहात पार पडला. समारंभाला पश्चिम बंगालचे राज्यपाल व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश श्यामल कुमार सेन, पद्मश्री पुरंदास बालू सम्राट, पद्मश्री काझी मासूम अख्तर, तसेच आचार्य डॉ. गोपाळ खेत्री यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

देशातील विविध राज्यांतील ११ निवडक समाजसेवकांना या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले असून त्यात डॉ. पोपेरे यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. याआधीही डॉ. पोपेरे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळालेला आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर ठसा उमटवला आहे. बदलापूर व ठाणे जिल्ह्याचे नाव
राष्ट्रीय स्तरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. पोपेरे यांच्या सामाजिक कार्याविषयीचे नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.



