शेवगाव तालुक्यात शासनाची फसवणूक करून नऊ लाख रुपये घरभाडे लाटले!
दत्तात्रय शिंदे
मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामसभेचा ठराव सादर न करता घर भाडे भत्ता घेणार्यां शिक्षकांकडून तब्बल नऊ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश शेवगाव चे गटशिक्षणाधिकारी यांनी दिले आहे
७ ओक्टोंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक ,मुख्याध्यापक, ग्रामसेवक ,तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, कृषी सहाय्यक, यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले असून त्याबाबत सन २०१९ पासून मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
अंत्रे ता. शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानदेव विठ्ठल सोलाट यांनी दिनांक २६/७/२०२३ रोजी गटशिक्षणाधिकारी शेवगाव यांच्याकडे ढोरसडे व अंत्रे येथील शिक्षकांनी मुख्यालयी राहत असले बाबत ग्रामसभेचा ठराव सादर न करता ,स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रशासनाकडे दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करून घरभाडे भत्त्याची रक्कम स्वीकारली असून संबंधित रक्कम वसूल करून फौजदारी स्वरूपाची कारवाई होणे करिता तक्रार अर्ज सादर केला होता.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी शिक्षकांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देऊन तसेच त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही शिक्षकांनी समाधानकारक खुलासे न दिल्यामुळे तसेच प्रत्येक वेळी वेगवेगळी व दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करण्यात येऊन त्यांच्याकडून माहे ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२२ अखेर त्यांना अदा करण्यात आलेल्या तब्बल नऊ लाख रुपये एवढा घर भाडे भत्ता वसूल करण्याचा आदेश दिला आहे.
शिक्षकांच्या विविध संघटनांकडून असलेला दबाव झुगारून तसेच तक्रारदार व शिक्षकांचे म्हणणे ऐकुन निष्पक्षपणे निर्णय देणाऱ्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाचे या प्रश्नावर विविध आंदोलने करणारे नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. सोपान रावडे व श्री.ज्ञानदेव सोलाट यांचेकडून स्वागत करण्यात आले आहे.या निर्णयामुळे मुख्यालयी न राहता घर भाडे भत्ता घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची धाबे दणाणले आहेत.व या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.