रोटरी तर्फे महिला दिन प्रभात संगीत रजनी च्या माध्यमातून साजरा

नाशिक दि ८ महिला दिन अणि कैलासशेठ रावत यांच्या लग्नाचा पन्नासाव्या वाढदिवस निमित्ताने रोटरी क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष ओमप्रकाशजी रावत यांनी उदाजी मराठाच्या गंगापूर रोड च्या निसर्ग संपन्न प्रांगणात गायनाची मैफिलची सकाळी ६:३० ला मेजवानी दिली.
८ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आयोजित केलेली महिला कलाकारांची शास्त्रीय संगीत मैफल रसिकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडली. उदाजी मराठा बोर्डिंग गंगापूररोड च्या निसर्गरम्य परिसरात राम प्रहरी आयोजित केलेल्या या संगीत मेजवानीला नाशकातील सर्व थरातील नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या.

पंडित हरिप्रसाद चौरसियांची शिष्या वैष्णवी जोशीच्या बासरी वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.पंडित चौरसिया यांच्या बासरीची झलक तिच्या बासरीच्या स्वरांमधून मिळाली.वैष्णवी भडकमकरच्या तबलावादनातून तिला मोलाची साथ संगत मिळाली. नंतरच्या सत्रात भक्ती पवार च्या शास्त्रीय गायिकेने रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवले.
रोटरीच्या या प्रात:कालीन संगीत आयोजनाचे सर्व उपस्थितांनी तोंड भरून कौतुक केले. विनायक रानडे, सी एल कुलकर्णी, एनसी देशपांडे यांच्या सूर तुमच्या दारी या संकल्पनेतून या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले.
खुर्च्या कमी पडल्याने अनेकांनी उभे राहून संगीत सुरावटींचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे अप्रतिम असे सूत्रसंचलन डॉ स्मिता मालपुर ह्यानी केले.

कार्यक्रमानंतर रुचकर नाश्त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला अशा प्रकारे रोटरी ने महिला दिन व अध्यक्षांच्या मोठ्या भावाच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला.कार्यक्रमास १५०-२०० रसिक श्रोते उपस्तिथ होते.सगळ्यांचीच सकाळ आणि दिवस संगीतमय झाली..अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसाराची संधी लाभल्याची कृतार्थ भावना माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर,मंगेश अपशंकर सचिव प्रशासन शिल्पा पारख,सचिव प्रकल्प हेमराज राजपूत ह्यानी रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या वतीने व्यक्त केली.