इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १०/०३/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फल्गुन १९ शके १९४६
दिनांक :- १०/०३/२०२५,
वार :- इंदिवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३७,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति ०७:४५,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति २४:५१,
योग :- शोभन समाप्ति १३:५६,
करण :- बव समाप्ति १९:५६,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – पू. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०८नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०८:१२ ते ०९:४१ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:४२ ते ०८:१२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:४१ ते ११:१० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०७ ते ०६:३७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
आमलकी एकादशी, घबाड ०७:४५ नं. २४:५१ प., दग्ध ०७:४५ प., भद्रा ०७:४५ प., व्दादशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १८ शके १९४६
दिनांक = १०/०२/२०२५
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
वयाने लहान असणार्‍या लोकांशी मैत्री कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल.

वृषभ
व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.

मिथुन
कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.

कर्क
भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे.

सिंह
पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. विरोधकांवर मात करता येईल.

कन्या
फसवेपणाचा आधार घेऊ नका. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो.

तूळ
बौद्धिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक
संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.

धनू
तुमच्यातील अहंमन्यता वाढू देवू नका. मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची दाखवाल.

मकर
स्थिर विचार करावेत. बोलताना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका.

कुंभ
गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धी चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.

मीन
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button