इगतपुरी तालुक्यातील वाकी बिटोरली येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटोरली येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत आरोग्य मूल्यमापन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिलांना आरोग्य, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली

.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक आरोग्य सल्लागार रणजीत देसले, पुनम वाव्हाळ (आरोग्य सल्लागार), राकेश वाव्हाळ,विकास गोवर्धने,प्रतीक्षा गोवर्धने, तसेच घोटी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. क्षीरसागर उपस्थित होते. त्यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योतीताई केदारे यांनी महिलांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती दिली. तसेच, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आशा कार्यकर्त्या, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सी. आर. पी. सविता कडाळे, तसेच ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.महिलांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग घेतला व आपल्या आरोग्याविषयी तपासणी व सल्ला घेतला. ग्रामस्थ व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पंचायत समिती व ग्रामपंचायतीने सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
