संभाजीनगर येथे धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक १४/०१/२०२५ रोजी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी संभाजीनगर येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महिला विभागाच्या वतीने धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरण आणि शेअर्स होल्डर नोंदणी अभियान राविण्यात आले

प्रमुख उपस्थिती सौ सुरेखाताई महिरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महिला विभाग ,सौ दुर्गाताई चव्हाण सहसचिव महाराष्ट्र राज्य महिला विभाग,सौ छायाताई हिवाळे संस्कार विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य महिला विभाग, सौ रेश्मा ताई गरड संभाजीनगर महिला ,सौ सुलेखा मनवर जालना जिल्हाध्यक्ष यांनी आयोजन केले होते
विद्यापीठाच्या प्रांगणात स्टॉल लावलेला होता संभाजीनगर येथील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
