कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिक प्रतिनिधी/ डॉ शाम जाधव
जागतिक महिला दिनानिमित्त जागृतीज् फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२५ रोजी शेवंता लॉन्स, नांदूर नाका, नाशिक येथे कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थापक प्रशांत शेळके तसेच अध्यक्षा ललिता नवघीरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात समाजाच्या विविध स्तरांतील महिलांचा सन्मान करण्यात आला. तळागाळातील महिलांपासून डॉक्टरेटपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५१ महिलांना कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित करन्यात आले
यावेळी मान्यवरांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक करताना त्यांच्या आत्मनिर्भरतेचा आणि संघर्षमय प्रवासाचा गौरव केला. जागृतीज् फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे महिलांना प्रेरणा मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.यावेळी जागृतीज् फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रशांत भगवान शेळके.अध्यक्षा ललिता रामदास नवघिरे,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षाली भोसले,मॉडेल अभिनेत्री.ऍडव्होकेट स्नेहल लोखंडे,मिसेस क्लासिक मलेशिया विनर २०२४ डॉक्टर मोनिका गोडबोले,यशोद शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टरेट,बाल मानस शास्त्रात विशेष प्राविण्य. ज्योती केदारे, शिंदे मिसेस युनिव्हर्स विनर,मिसेस मलेशिया विनर, ग्रामसेविका. आरती जैन, मिसेस बिकानेर २०२३ मिसेस राजस्थान २०२३ मिसेस नाशिक २०२३ अभिनेत्री.डॉक्टर आशाताई पाटील, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती.शिवानी अनिल महितो,हेयर & स्किन ट्रीटमेंट मेकअप आर्टीस्ट.संदेशा पाटील, मॉडेल/अभिनेत्री.मास्टर गणेश जगदिशन,लेखक,चित्रपट निर्माता,प्रशिक्षक,शिव सिद्ध योगी महाराज.डॉ सुप्रिया चांदवडकर,आयुर्वेदाचार्य.श्रीमती मंजुताई जाखडी समाजसेविका.रुपाली पवार, सेल्फ डिफेन्स ट्रेनर/सिने अभिनेत्री मॉडेल.छाया ताई अनिल कोठावदे,समाजसेविका.करूना अनिल आहेर, महाराष्ट्र पोलीस हवालदार नाशिक.गीता अंबादास बैरागी,समाजसेविका डॉ.कोमल वैभव महाले,अध्यक्षा-विधीज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था.सुरेश पवार,अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान.संजय देशमुख,अध्यक्ष साईधनवर्षा फाऊंडेशन नाशिक. सर्व शाखा अध्यक्ष सौ.मनीषा सुदाम आडके(सिल्वासा शाखा) गौरी अमोल क्षीरसागर (पनवेल शाखा अध्यक्ष),रजनी राजेंद्र शिंदे (पनवेल),नीलम प्रशांत वाघमारे. (पनवेल शाखा उपाध्यक्ष),मनीषा राजेश ठुबे (कल्याण शाखा अध्यक्ष),ज्योती दिनेश जगताप (अहिल्यानगर शाखा अध्यक्ष),दिपाली राजेंद्र पुराणिक अहिल्यानगर शाखा उपाध्यक्ष,श्रीमती अर्चना सरोदे. (सिलवासा शाखा उपाअध्यक्ष),मनीषा आसाराम बोर्डे ( नेवासा शाखा अध्यक्ष),मनीषा आडके (शाखा अध्यक्षा- सिल्वासा) तसेच सदस्या शोभा सावंत,छाया कोठावदे,करुणा आहेर – सदस्या,मयुरी शुक्ल,हर्षाली भोसले,आरती जैन,दिपाली तिडके,शीतल काकुळते – सदस्या,मोनिका धनविजय,माधुरी पोवार,पल्लवी फगरे,अनिता शिरुडे मोनिका कमानकर,निलम कुमावत,प्रतिभा गायकवाड,स्नेहा चव्हाण,प्रतिभा गायकवाड,गौरी दिवाण,अश्विनी घोरपडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सबलीकरणाचा संदेश देणारा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या वेळी बोलताना सौ ललिता रामदास नवघिरे जागृतीज फाऊंडेशन नाशिक अध्यक्षा यांनी तळागाळातील महिलांचा खऱ्या अर्थाने आज सन्मान करताना आम्हाला खूप आनंद मिळाला आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही भरून पावलो.कार्यक्रम खूपच सुंदर आणि प्रेरणादायी झाला महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केला होता त्या बद्दल आमचे सर्व पदाधिकारी प्रशांत पवार ,शुभम नवघिरे निलिमा शेळके आणि गायत्री नवघिरे , दिपक जैन यांनी खूप मेहनत घेतली.