रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे एक्यूप्रेशर चिकित्सा शिबिराचे आयोजन!

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रोटरी हेल्थ सोसायटी यांच्यातर्फे सर्वसामान्यांसाठी विनामूल्य एक्यूप्रेशर चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एक्यूप्रेशर उपचार पद्धती ही कमी खर्चात विविध दिर्घकालीन व्याधींवर परिणामकारक विना साइड इफेक्ट उपाययोजना करणारी पुरातन चिकित्सा पद्धती आहे. विविध औषधी उपचार आणि औषधांनी बेजार झालेले व कोणताही उपाय ना सापडलेल्या रुग्णांसाठी ही चिकित्सा पद्धती एक वरदान आहे. या शिबिरात खास जोधपुर होऊन आलेली तज्ञ मंडळी अद्ययावत उपकरणांच्या मदतीने उपचार करणार आहेत. सदर शिबिर गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये सोमवारपासून सुरू झाले असून ते २७ डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे. शिबिरासाठी नाम मात्र शंभर रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. सदर शिबिरात सांधेदुखी, थायराइड, डोकेदुखी, मणक्याचे विकार व तत्सम सर्व व्याधींवर उपचार केले जाणार आहेत.
सर्व नाशिककरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष ओम प्रकाश रावत आणि रोटरी हेल्थ सोसायटीचे कार्याध्यक्ष सुरेश कांबळे यांनी केले आहे.
