संगतीप्रमाणे मनुष्य ध्येय ठरवितो”—-हभप.डॉ विकसानंदजी महाराज

पारनेर प्रतिनिधी:-
श्री क्षेत्र काकनेवाडी येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले.यावेळी जागरचे हरिकिर्तन हभप डॉ.मिसाळ महाराज यांचे झाले.
किर्तन सेवेसाठी महाराजांनी
तुज मागणे ते देवा
आम्हा तुझी चरण सेवा!!
तुकाराम महाराजांचा हा मागणीपर अभंग सेवेसाठी घेतला होता.
येथे असलेल्या प्रत्येकाला एक अधिकार आहे तो म्हणजे भगवंताशी संवाद साधण्याचा. जसा प्रत्येकाला एक जवळचा मित्र सखा असतो तसा भगवंताला आपला सखा माना जो आपल्याला शेवटपर्यंत साथ देतो.
आयुष्यात मानवाच्या संगतीला फार महत्व आहे. चोरांच्या, दुर्जनाच्या संगतीत जर गेलो तर सज्जनाची बुद्धी तसाच विचार करते.
आणि सज्जनाच्या संगतीत गेलो तर आपली बुद्धी तसेच ध्येय ठरविते. हा विचार महाराजांनी या वेळी सांगितला.
या कार्यक्रमात काकनेवाडी गावातील सुपुत्र युवराज वाळुंज आणि शेजारील तिखोल गावची मनिषा ठाणगे यांची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला.