जिल्हास्तरीय भरारी पथकाची पवारवाडी शाळेस भेट!

मुख्याध्यापिका कोल्हे यांचे केले कौतुक
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
सुपा ता. पारनेर येथील पवारवाडी जिल्हा परिषद शाळेस जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख लेखाधिकारी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे अविनाश कुलकर्णी व जिल्हा परिषदेचे अधीक्षक (ओ एस ) हेमंत साळुंखे यांनी अचानक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी शाळेत भेट दिली. त्यावेळेस शालेय पोषणचे किचन शेडची पहाणी करून किचन मधील तांदूळ व धान्यादी मालाचे रेकॉर्ड प्रमाणे तांदूळ व धान्यादी मालाचे त्या ठिकाणी पहाणी करुन मोजमाप करण्यात येऊन ते रेकॉर्ड प्रमाणे आहे का याची पूर्ण बारकाईने खात्री करण्यात आली. किचन शेडची व अन्न शिजवत असलेल्या भांडयाची स्वच्छता, शालेय परिसरामध्ये शालेय परिसर स्वच्छता, मुलांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था, मुला-मुलींना शौचालय व मुताऱ्यांची व्यवस्था ,शालेय पोषणचे रेकॉर्ड किर्दप्रमाने व्हाउचर फाईल रजिस्टर, दैनंदिन नोंदवही, चव रजिष्टर,पूरक आहार रजिस्टर ,स्वयंपाकी यांचा करारनामा व मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट या सर्व बाबींची बारकाईने प्रत्येक मुद्द्याची सविस्तर पुरावे पाहून या भरारी पथकाने खात्री करून घेतली पूरक आहार वाटप करण्यात येतो का याची मुलांना विचारून चौकशी करण्यात आली या सर्व पूर्तता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केल्याचे त्यांना आढळून आले त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक व शाळेच्या सर्व शिक्षकांचे त्यांनी खूप खुप असे कौतुक केले. त्यावेळेस मुख्याध्यापक यांनी शाळेची माहिती देताना, या वाडीमध्ये दाखल पात्र एकही विद्यार्थी नसताना आज या शाळेचा पट ११५ पट झालेला असून या ठिकाणी शिष्यवृत्ती, नवोदय , ॶॅबेकस , कराटे यांचेही जादा तास घेण्यात येतात व गुणवत्तेत सुद्धा ही शाळा आमची मागे नाही हे आम्ही मागील शिष्यवृत्ती व नवोदय निकालावरून सिद्ध करून दाखवले आहे. त्यावेळी भरारी पथकाचे अविनाश कुलकर्णी व हेंमत साळुंके साहेबांनी एवढे उपक्रम एवढ्या छोट्याशा वाडीच्या शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंत वर्ग शिक्षक संख्या कमी असताना राबवतात. त्यामुळे या सर्व कामाचं भरारी पथकाने कौतुक केले व आश्चर्य व्यक्त केले. या शाळेची गुणवत्ता चांगली असल्यामुळेच परिसरातील मुले या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने गाडी करून येतात. यावेळी भरारी पथकाने समाधान व्यक्त करून प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेचे योग्य नियोजन शाळेने केल्याचे पथकाचे प्रमुख अविनाश कुलकर्णी व हेमंत साळुंखे अधीक्षक ( ओएस ) अहमदनगर यांनी व्यक्त केले त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे , उपाध्यापक संतोष दिवटे ,वर्षा साठे उपस्थित होते.