राजापूर महाविद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न …

संगमनेर- संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालयात दिनांक 13/10/2023 रोजी विद्यार्थी विकास मंडळातर्फे आरोग्य शिबिर संपन्न झाले
.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुभाष कडलग यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून इंद्रजित थोरात संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना संगमनेर उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण यशाची गुरुकिल्ली आहे असे सूचक मत मांडले..आर एम कातोरे यांनी आपले आरोग्य हीच संपत्ती आहे असे विद्यार्थ्यांना संबोधित केले.याप्रसंगी डॉ.शालिनी सचदेव यांनी बदलत्या जीवन शैलीमुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम ,वाढणारे आजार यावर योग्य आहार असणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.
यावेळी मथुराबाई थोरात दंत महाविद्यालय संगमनेर येथील डॉक्टरांची टीम ने दातांचे आरोग्य व आजार यावर निदानात्मक चिकित्सा केली .
यावेळी संगमनेर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन संतोष हासे,तसेच माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत राहटळ
प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड अनिल गोडसे ,उपाध्यक्ष आर पी हासे, संचालक मुरली हासे, भारत शेलकर ,पी डी.हासे,भानुदास सोनवणे ,स्कूल कमिटी चेअरमन भाऊसाहेब हासे या सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार थोरात यांनी केले तर आभार शीतल देशमुख यांनी मानले.