इतर

राज्यात ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्सच्या पडताळणी साठी १०४ अर्ज प्राप्त

महादर्पण वृत्तसेवा

भारत निवडणूक आयोगाने दि.०१.०६.२०२४,
दि.१६.०७.२०२४ व दि.३०.०७.२०२४ रोजीच्या पत्रांन्वये ईव्हीएम – व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory
microcontroller च्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात करावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील ३१ जिल्हयांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात एकूण १०४ अर्ज प्राप्त झालेले आहेत.
या १०४ अर्जांमधून महाराष्ट्र राज्यातील १,००,४८६ मतदान केंद्रापैकी ७५५ मतदान केंद्रावरील ईव्हीएम संचाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील उर्वरित ५ जिल्हयात (सिंधुदुर्ग, नंदुरबार, अमरावती, वर्धा व गडचिरोली) ईव्हीएम- व्हीव्हीपॅट
मशिन्सच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी आणि पडताळणी संदर्भातील अर्ज प्राप्त झालेले नाहीत.
भारत निवडणूक आयोगाच्या दि.३०.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी आणि
पडताळणी संदर्भात उत्पादक कंपनीकडून तपासणीच्या तारखेआधी ३ दिवस पर्यंत अर्जदार त्यांचा तपासणीचा अर्ज कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतो. त्यानुसार संबंधित अर्जदारास त्याने जमा केलेले शुल्क त्यांना परत करण्याची तरतूद आहे. ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी आणि पडताळणी दरम्यान निवडणूक याचिका दाखल नसलेल्या प्रकरणी ईव्हीएम- व्हीव्हीपॅटच्या संचातील डेटा क्लियर करण्यात येऊन अभिरुप मतदान
(मॉकपोल) घेण्यात येते आणि सीयु मधील डेटा व व्हीव्हीपॅट मशिन्स मधील स्लीप्स यांची आकडेवारी जुळल्याबाबत निरीक्षण करण्यात येते. त्यावरुन संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज योग्य प्रकारे चालत असल्याची खात्री करण्यात येते.

details of EVM C & V appliaction and their fees
Upto :- 04.12.2024
सविस्तर माहिती येथे पहा-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button