राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १७/०६/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठा २७ शके १९४४
दिनांक :- १७/०६/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०६,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०६:११, चतुर्थी २७:००,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति ०९:५६,
योग :- ऐंद्र समाप्ति १७:१७,
करण :- बव समाप्ति १६:३२,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – मृग,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयदिन वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५१ ते १२:३० पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३३ ते ०९:१२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१२ ते १०:५१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३० ते ०२:०९ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
संकष्ट चतुर्थी(मुंबई चं.उ. २२:२८), घबाड ०९:५६ नं. २७:०० प., भद्रा ०६:११ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २७ शके १९४४
दिनांक = १७/०६/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

वृषभ
परदेशातील आप्तांकडून शुभ वार्ता मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे.

मिथुन
उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा.

कर्क
कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. तब्येतीत सुधारणा होईल.

सिंह
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल. नवीन लोक संपर्कात येतील.

कन्या
उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.

तूळ
आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.

वृश्चिक
नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील.

धनू
अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

मकर
धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका. शांत व संयमी विचार करावा.

कुंभ
संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल.

मीन
क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण कराल. मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button