शाहूनगर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती
अकोले प्रतिनिधी
शाहूनगर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज, मावळे, जिजामाता ,गवळणी ,असे नटून थटून विद्यार्थी आले होते. सुरुवातीला शाहूनगर परिसरातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी उद्योजक चेतन भाऊ नाईकवाडी, अॅडवोकेट वसंतराव मानकर साहेब, ॲडव्होकेट भाऊसाहेब गोडसे, कार्यकर्ते नवनाथ मोहिते ,दलित मित्र प्रकाश साळवे, सामाजिक कार्यकर्ते हिम्मतशेठ मोहिते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतीराम साळवे ,माजी उपाध्यक्ष राजेंद्र ठावरे, ज्ञानेश्वर साळवे, धनंजय मोहिते, अंगणवाडी ताई शिंदे मॅडम सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रकाश साळवे ,चेतन भाऊ नाईकवाडी, वसंतरावजी मंनकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट भाऊसाहेब गोडसे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बांगर सर ,साबळे सर ,अध्यक्ष कांतीराम साळवे व विकास अवचिते यांनी विशेष परिश्रम घेतले .आभार श्री राजेंद्र ठाकरे यांनी मानले व दुपारी बारा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.