इतर

ऑनलाईन ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे मिळणार मंत्रालयात प्रवेश!

मुंबई, दि. २७: मंत्रालय सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चेहर्याच्या ओळखीवर आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. आता मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपद्वारे प्रवेश मिळणार आहे.

प्रवेश प्रक्रिया आणि अटी:

अभ्यागतांना केवळ संबंधित विभागात, ठरलेल्या वेळेत आणि अनुमत्याशीर मजल्यावरच प्रवेश करता येईल.

अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास संबंधित अभ्यागतांवर कारवाई होईल.

मंत्रालयातील काम पूर्ण झाल्यावर निर्धारित वेळेत बाहेर पडणे बंधनकारक आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अभ्यागतांसाठी विशेष सोय:

त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश दिला जाईल.

दुपारी १२ नंतर स्वतंत्र रांगेची सुविधा उपलब्ध असेल.

प्रवेशासाठी वैध प्रमाणपत्र बरोबर ठेवणे आवश्यक आहे.

सर्वसामान्य अभ्यागतांसाठी प्रवेश नियम:

दुपारी २ नंतरच सर्वसामान्य अभ्यागतांना प्रवेश दिला जाईल.

प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे ऑनलाइन प्रवेश पास घेणे आवश्यक आहे.

आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यांसारखे शासनमान्य ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

स्मार्टफोन नसलेल्या किंवा अशिक्षित व्यक्तींसाठी सुविधा:

गार्डन गेट येथे विशेष मदत केंद्र उपलब्ध असेल.

येथे ऑनलाईन नोंदणी आणि मदतीसाठी एक खिडकी सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे नोंदणी कशी करावी?

  1. ‘Digi Pravesh’ ॲप Android साठी Play Store आणि iOS साठी Apple Store वर उपलब्ध आहे.
  2. प्रथम एकदाच नोंदणी करावी लागेल.
  3. आधार क्रमांकाच्या आधारे छायाचित्र ओळख पटवून नोंदणी पूर्ण करावी.
  4. संबंधित विभागासाठी स्लॉट बुक केल्यावर QR कोड मिळेल.
  5. मंत्रालयाच्या बाहेरच्या खिडकीवर QR कोड दाखवून RFID कार्ड मिळेल.
  6. सुरक्षा तपासणी झाल्यानंतर RFID कार्डद्वारे प्रवेश मिळेल.
  7. मंत्रालयातून बाहेर जाताना RFID कार्ड सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक आहे.

नवीन प्रणालीचे फायदे:

प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतीमानता. सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम. रांगेशिवाय जलद प्रवेश मिळवण्याची सुविधा.

डिजीप्रवेश’ ॲपच्या माध्यमातून मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि अभ्यागतांना सोयीस्कर प्रवेश मिळेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button