संगमनेर खुर्द सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड ,थोरात गटाचे वर्चस्व

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संगमनेर खु वि.का. सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे.
माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा सोसायटीने कायम सभासद व कर्जदारांचे हित जोपासत आर्थिक दृष्ट्या चांगली प्रगती साधली आहे. आणि आता या सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाली आहे.
या नूतन संचालक मंडळात रमेश सुपेकर ,किसन सातपुते ,अजित शिंदे ,भाऊसाहेब गुंजाळ ,रामराव शिंदे ,सुभाष शिंदे लक्ष्मण पुरी, रंजना गुंजाळ, चंद्रकला गुंजाळ, भारत पावबाके, अण्णासाहेब गुंजाळ आदींचा समावेश आहे.
ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सुभाष भीमाशंकर गुंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच श्वेता मंडलिक ,गणेश शिंदे , बिलाल शेख, भगवान गोफने ,गुलाब शेख, गणेश शिंदे ,अण्णासाहेब गुंजाळ ,दत्तात्रय खुळे, प्रसाद गुंजाळ, डॉ. रवींद्र गुंजाळ ,वाल्मीक गुंजाळ, राजेंद्र देशमुख ,रमेश गुंजाळ, काशिनाथ शिंदे ,उत्तम खते ,राजू जोर्वेकर, मच्छिंद्र जोरवेकर, महेंद्र शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या नूतन संचालक मंडळाचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ. सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे , कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात ,कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात , माधवराव कानवडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.