नामस्मरण हीच खरी भक्ती व सुख समाधानाचे साधन – हभप नारायण महाराज काळे

” “
–दत्ता ठुबे
पारनेर – श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आपल्याजवळ व अंतकारणात आहे , त्यांचे नामस्मरण हीच खरी भक्ती व सुख समाधानाचे साधन होय , असे प्रतिपादन ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांनी केले .
पारनेर तालुक्यातील सर्वांत मोठे प्रशस्त , निसर्ग रम्य व लोक सहभागातून उभे राहिलेले रांधेच्या माळवाडी येथील अनिल आवारी यांच्या संकल्पनेतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या देवस्थान मंदीर परिसरात पैठण येथील श्री स्वामी कथाकार , ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांच्या सुश्राव्य वाणीतील श्री स्वामी कथेच्या पहिल्या दिवशी च्या कथे प्रसंगी बोलताना महाराज पुढे म्हणाले की , आज रांधेच्या या माळवाडीत साक्षात भक्त पंढरी अवतरली असून अक्कलकोट चे श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात रांधेत अवतरले आहेत . या कथेच्या निमित्ताने अथक परिश्रम घेऊन अतिशय उत्तम, निट नेटके नियोजन केले .
त्यांनी तुम्हांला ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली .भाविक भक्तांनी कोणाच्या ही माध्यमातून भक्ती व चरित्राचे श्रवण केले , तरी आनंद व समाधान मिळते . अनिल आवारी यांनी लोकसहभागातून रांधे सारख्या ग्रामीण भागात एवढे सुसज्ज व भव्य मंदीर उभे केले . या स्वामी कथेसाठी त्यांनी परिश्रम पूर्वक नियोजन केले . स्वामींनी दिलेला उपदेश म्हणजे नामस्मरण होय . दुःखात जरी स्वामींचे नामस्मरण केले , तरी ते धीर देऊन म्हणतात , ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे “, त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता निशंक पणे ही स्वामी कथा श्रध्देने ऐकल्यावर तेवढीच ही कथा सुंदर वाटेल . स्वामींचे ” नामस्मरण ही च खरी भक्ती व सुख समाधानाचे साधन ” आहे . स्वामी आपल्याजवळ व अंतकरणात आहे . त्यामुळे भाविक भक्ताला हवे ते मिळविण्याची संधी या कथेत आहे . किती मंद बुद्धी असलेल्या मुलाने ही कथा ऐकली, तर तो परीक्षेत यशस्वी होतोच . श्री स्वामी कृपेने अपंग माणूस सर्वांत मोठे शिखर असलेले कळसूबाई चे शिखर चढू शकतो . श्री स्वामी समर्थ चरित्र आगाध असून माझ्याकडून संपूर्ण जीवन चरित्र वर्णन होऊच शकत नाही . माझ्यावर जर श्री स्वामी कृपा असेल , तर मी जास्तीत जास्त स्वामी कथा सांगू शकतो . स्वामी कथेतून दिव्य अनुभूती येते , त्यासाठी भाविकांनी श्रध्देने कथा श्रवण करा , त्यासाठी पूर्ण तल्लीन व्हा . श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त गुरुंचे ४थे अवतार म्हणजे साक्षात दत्त गुरुंचे अवतार आहे . श्री स्वामी समर्थ हे शब्द व अक्षरे नाहीत , तर दुःखातून बाहेर काढणारा मंत्र आहे . समस्या नाही , असा एक ही व्यक्ती नाही .

आपल्याला जे नको असते , नेमके मन तेथेच जाते , मन खूप चंचल आहे . ज्ञानरूपी मंदिरात जायचे असेल , तर सेवारूपी वाळवंटातून जावे लागते . मंत्राचे उच्चारण करण्यासाठी काही नियम असतात , ते पाळावे लागतात . जो कोणी आई वडीलांचे दोन्ही हात जोडून चरण स्पर्श करीन . तीन वेळा त्यांना प्रदक्षिणा घालीन,त्याची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल हीच खरी आई वडीलांची सेवा आहे,असे ही ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांनी किर्तन सेवेच्या कथेतून शेवटी उद्बोधन केले.
श्री स्वामी समर्थ महाराजां ची पहिल्याच दिवसाची कथा श्रवण करण्याकरिता पारनेर , जुन्नर तालुक्यातील महिला , पुरुष , आबालवृद्ध भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तदनंतर उपस्थित भाविक भक्तांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती घेण्यात आली .
यावेळी ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.महाप्रसादाने पहिल्या दिवशी च्या कथेला पुर्णविराम देण्यात आला.

– रांध्या सारख्या छोट्या गावात तेही माळवाडीसारख्या छोट्या वाडीत अनिल आवारी या छोट्या स्वामी भक्तानी लोकसहभाग व लोक वर्गणीतून श्री स्वामी समर्थ महाराजां चे दिव्य , अद्भूत , निसर्ग रम्य, देखणे मंदीर उभे करून तेथेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या कालखंडात राज्यात प्रसिद्ध असलेले स्वामी कथेचे किर्तनकर , ज्ञानमार्तंड या उपाधीने सन्मानित क्षेत्र पैठणचे हभप नारायण महाराज काळे यांच्या मुखातून स्वामी कथेचे नियोजन केल्याने भाविक भक्तांचे जथ्येचे जथ्ये पहिल्याच दिवसांपासून रांधे च्या माळवाडीकडे रवाना होताना दिसत आहे.कथेचे अतिशय निटनेटके नियोजन , उत्कृष्ठ बैठक व्यवस्था , लाईट व साऊंड सिस्टीम , कार्यकर्त्यांमार्फत दुचाकी , चार चाकी पार्किंग नियोजन , महाआरतीसाठी मान्यवर तदनंतर शिस्तबद्ध पद्धतीने मिष्ठान्नाचा महाप्रसाद,वाखाण्याजोगे नियोजनाचे सर्वजण कौतूक करत आहे .