अहमदनगर

पाण्यात बुडणाऱ्याला वाचविणारे जवानच नदीत बुडाले!

अकोले प्रतिनिधी
 प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेत असणारी बोटच नदीत बुडल्याने तीन जवानांचा बुडन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (अकोले जिल्हा अहमदनगर ) येथे घडली या घटनेमुळे बचाव कार्य करणाऱ्या टीम च्या सुरक्षिततेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे

येथून समोर आली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अकोले तालुक्यातील सुगाव जवळ मनोहरपूर येथे काही तरुण मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते. उष्णतेमुळे सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे प्रवरा पात्रातील मिनी बंधाऱ्याजवळ अंघोळीसाठी पाण्यात उतरले त्यांना बंधाऱ्याच्या भिंती वरून पडणाऱ्या पाण्याच्या दाबाचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

त्यापैकी सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तर अर्जुन याचा शोध सुरू होता स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वनविभागाच्या रोपवाटिके जवळ प्रवरा नदी पात्रात ही घटना घडली

बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी
एसडीआरएफ पथकाला बोलाविण्यात आले तरुणाच्या शोधासाठी धुळ्याहून आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन नदीपात्रात उतरले होते. या बचाव पथकात सहा जवानांचा समावेश होता

गुरुवारी सकाळी बुडाले. सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वनविभागाच्या रोपवाटिके जवळपास प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी पाण्यात दोन तरूण पाण्यात बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसर्याचा शोध सुरू होता.

शोध घेत असताना यात एसडीआरएफची एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाचजवान आणि एक स्थानिक असे सहा जण बुडालें.

यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते. दुसरा अशोक पवार अत्यावस्थ असूनअकोले येथे डॉ भांडकोळी रूग्णालयात उपचार घेत आहे.

तर प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या एसडीआरएफच्या तीन जवानांचा पाण्यात बुडन मृत्यू झाला त्यांचे मृतदेह मिळाले असून
पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर वाकचौरे याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा देखील प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

बंधाऱ्या लगत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अर्जुन रामनाथ जेडगुले आणि सागर पोपट जेडगुले हे दोघे पाण्यात बुडाले होते. यांच्या सोबत असलेल्या इतरांनी तसेच गावकरी, पोलीस आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी शोध सुरु केला होता. त्यांना सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह शोधण्यात यश आले होते.

तर अर्जुनचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफ ची टीम बोलवण्यात आली होती. मात्र त्यानंतर मोठी दुर्घटना घडली

निळवंडे धरणावर आंदोलन होणारच !

सर्वपक्षीय कार्यकर्ते व अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने उद्या दिनांक 24 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता निळवंडे धरणावर आंदोलन पुकारले आहे.

अकोले तालुक्यातील सुगाव -मनोहरपूर येथे नदीपात्रात बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मृतदेह काढण्यासाठी पालकमंत्री यांनी आवर्तन तात्पुरते थांबविले असले तरी पाणी वाहून नेण्याचा ते पुन्हा नक्कीच प्रयत्न करतील.

सबब उद्या नगर येथून सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळेसाहेब हे आंदोलनाला सामोरे येत असून त्यांच्याबरोबर निळवंडे धरण येथे आपण चर्चा करणार आहोत व त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत.
सबब उद्याचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये होईल आपण सर्वांनी आंदोलनासाठी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सर्व सर्वपक्षीय कार्यकर्ते व अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीचे वतीने केले आहे

पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (वय 25, रा. धुळवड पिंपरी, ता. सिन्नर) हा पाण्यात मृत अवस्थेत सापडला तर अर्जुन बबन जेडगुले (वय 18, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हा 24 तास उलटूनही बेपत्ता आहे. ही सर्व धक्कादायक घटना काल बुधवार दि. 22 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.
अर्जुन जेडगुले याचे शोधकार्य शर्यतीने सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. त्यामुळे, सकाळीच या तरुणाचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) ची टीम बोट घेऊन अकोले तालुक्यातील सुगाव परिसरात दाखल झाली. तेथील एका स्थानिक व्यक्तीला पाण्यातील घटनास्थळ दाखविण्यासाठी बोट घेऊन पथक नदीपात्रात गेले. परंतु ही बोट अचानक उलटी झाली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपीचंद पावरा (कॉन्स्टेबल), वैभव सुनील वाघ (चालक) हे तिघे मयत झाले आहे तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार हे उपचार घेत आहे. तर स्थानिक गणेश मधुकर वाकचौरे (वय-38,रा. मनोहरपुर, ता. अकोले) हा बेपत्ता आहे. ही सर्व घटना आज गुरुवार दि. 23 मे रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यामुळे या घटनेत एकुण चार जण मयत झाले असुन तर दोघे बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button