गोकुळ आणि जिल्हा बँकेतील शेतकरी हिताच्या कारभारामुळे सहकार क्षेत्रात नवा आदर्श

दत्ता ठुबे
कोल्हापूर-कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध बक्षीस वितरण समारंभ आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पार पडला. सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरी शुभारंभ तसेच गोकुळच्या स्वमालकीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ साहेब आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या हस्ते तसेच आमदार चंद्रदिप नरके व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी.पाटील साहेब यांच्या उपस्थितीत गोकुळ शिरगाव येथे पार पडला.
गोकुळ दुधसंघ असेल किंवा जिल्हा बँक असेल शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या या संस्थांनी राजकारण विरहित कारभारामुळे सहकारामध्ये एक नविन आदर्श निर्माण केला आहे. पारदर्शक आणि शेतकरी हिताच्या कार्यपद्धतीमुळे या संस्थांनी विश्वासार्हता टिकवली आहे.येत्या काळातही हीच परंपरा कायम राखून जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक बळकट कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील ,माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे,ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी),शशिकांत आनंदराव पाटील- चुयेकर,अजित नरके, रणजीतसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, अंबरीषसिंह घाटगे, चेतन नरके,प्रकाश पाटील, बयाजी शेळके, श्रीमती अंजना रेडेकर, युवराज पाटील, अभिजीत तायशेटे, किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, बाळासो खाडे, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, संचालिका स्मिता गवळी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाबासो देवकर, माणिक पाटील- चुयेकर, मार्केट कमिटीचे संचालक सुयोग वाडकर, भारत पेट्रोलियमचे मॅनेजर अजय रुके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.