ग्रामीण
पी .जी. नवले यांचे निधन

अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील इंदोरी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ गंगाधर नवले वय80 यांचे नुकतेच निधन झाले.इंदोरी ग्रामपंचायतचे सरपंच , विठ्ठल देवस्थान चे अध्यक्ष,आगस्ती कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले .जिल्हा मराठा संस्थेत इंदोरी, समशेरपुर, सारोळे पठार आदी शाळांमधून त्यांनी ज्ञानदानाचे काम केले .त्यांच्या पश्चात एक मुलगा ,एक मुलगी, सून, नातवंडे, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.अॅड. सुनील नवले व बायसा बाळासाहेब कांडेकर यांचे ते वडील होत. तर विठ्ठल नवले यांचे बंधू होत.