दादाभाऊ केदारे यांना मंत्रालय वार्ताचा समाज भूषण पुरस्कार

कल्याण – आज दि.29/3/2025 रोजी मुंबई मंत्रालय वार्ता याच्या वतीने आज मुंबई या ठिकाणी यशवंतराव चव्हाण आॅडिटेरीम सेंटर या ठिकाणी दादाभाऊ केदारे यांना मंत्रालय वार्ताचा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला
भारताचे राष्ट्रीय नेते, मा.खासदार.शरदचंद्र पवार व खासदार, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दादाभाऊ केदारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला
यावेळी ,राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती , मंत्रालय वार्ता चे संपादक तथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अॅड. अनिल आहिरे व महाराष्ट्राची कोकिळा महा गायीका सौ .निशा भगत हे होते तर या सोहळ्यासाठी राष्ट्रीय प्रवक्ते प्रोफेसर डाॅ.साहेबराव निकम ,महादेव मस्के राज्य अध्यक्ष.महेंद्र बेदमुथा सहसंपर्कप्रमुख, श्रीजित वारीयर निरीक्षक,राजु पाटील (ठाणे जिल्हाध्यक्ष), विशाल भोईर( मुंबई जिल्हाध्यक्ष)9,अॅड.ललिता सावंत (मुंबई शहर अध्यक्ष) ,नम्रता कायस्थ (जिल्हाध्यक्ष नाशिक ),वर्षा बोरसे (जिल्हाध्यक्षा नाशिक ग्रामीण.).सनी कदम (नाशिक जिल्हा उपाध्यक्ष) तसेच इतर पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.