वाहून गेलेला रस्ता आमदार लंके यांच्या माध्यमातून 24 तासात पूर्ण !

दिलेला शब्द तात्काळ पाळणारा आमदार म्हणून मस्केवाडी ग्रामस्थांकडून आ.लंकेचे कौतुक !
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील मस्केवाडी या ठिकाणी पिलानी वस्ती रस्त्यावरील असणाऱ्या नदीला अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे रस्ता वाहून गेला .रस्त्याची झालेली दुर्दशेमुळे पिलानी वस्तीवरील नागरिकांचा संपर्क तुटला होता. म्हस्केवाडीचे सरपंच डॉ. किरण पानमंद यांनी व
उपसरपंच गोविंदशेठ साबळे , सावळा शेठ पानमंद, अविनाश पानमंद
सुदामनाना म्हस्के , बाळासाहेब म्हस्के , भाऊशेठ गोरडे , अरूनशेठ गोरडे, गणेशशेठ गोरडे , संदीप म्हस्के , साहेबराव पानमंद , राजेंद्र गोरडे , बाबाजी म्हस्के , दीपक म्हस्के,शिवाजी म्हस्के ,वैभव भन गडे ,दशरथ गोरडे,संभाजी गोरडे,सुखदेव गोरडे,सुभाष गोरडे,सचिन गगे यांच्यासह पिलामी वस्ती , भंदे वस्ती वरील
संबंधित म्हस्केवाडी ग्रामस्थांनी या वस्तीवरील लोकांचे अडचण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना सांगितले व क्षणाचाही विलंब न करता कुठलाही निधी उपलब्ध नसताना आमदार निलेश लंके यांनी मळगंगा कन्स्ट्रक्शनला तात्काळ सदर ओढ्यामधे नळ्या टाकून रस्त्याची सोय करण्यास सांगितले . व सदर ठेकेदारांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण यंत्रणा त्या रस्त्यासाठी उपलब्ध केली व वाहून गेलेल्या या रस्त्यावर 24 तासात नदीत सिमेंट काँक्रीटचे पाईप टाकून पुलाचे काम करत वस्तीवरील रस्त्याची समस्या तात्पुरती सुरू केली .
तात्पुरत्या स्वरूपात जरी रस्त्याचे काम केले असले तरी भविष्यात पाणी बंद झाल्यानंतर एक दर्जेदार व कायमस्वरूपी पुलाचे काम करून देईन असा शब्द यावेळी आमदार निलेश लंके यांनी दिला .
गेले अनेक दिवसापासून असलेली रस्त्याची गैरसोय दूर झालेली असली तरी आमदार निलेश लंके हे दिलेल्या शब्द पाळणारे आमदार आहेत असे सरपंच किरण पानमंद व म्हस्केवाडी ग्रामस्थांकडून आमदार लंके यांचे म्हस्केवाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले .तसेच पुलासाठी व या कामासाठी प्रयत्न करत असलेले गावचे ग्रामस्थ,आजी माजी सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य यांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर वस्तीच्या रस्त्याची समस्याचा पाठपुरावा केला म्हणून आमदार निलेश लंके यांनी मस्केवाडीच्या जबाबदार नागरिकांचे कौतुक केले .