इतर

रायतेवाडी येथील त्या कुटूंबाला साईसमर्पण फाऊंडेशनचा मदतीचा हात!


संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील रायतवाडी येथील संतोष अशोक सोनवणे हया हातावर पोट असलेल्या कुटुंबाच्या छप्पराच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागून संपूर्ण घर यात जळून खाक झाले. झालेल्या दुर्दैवी घटनेत एका कालवडी चा होरपळून मृत्यू झाला तर एक गाई गंभीररित्या भाजली होती. सुदैवाने यात कुठलीही मनुष्य हानी झाली नाही मात्र झालेल्या घटनेने सदर सोनवणे परिवार बेघर झाला. मोठ्या प्रमाणात नुकसान या परिवाराचे झाले आहे. सदर सोनवणे कुटुंब हे गरीब असून कुटुंबामध्ये मुलगा आणि आईच सध्या वास्तव्य करत आहे. काही दिवसांपूर्वीच वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. यामधून सोनवणे परिवार सावरतो नाही तेच ही जळीताची दुर्दैवी घटना घडली.आगीत बघता बघता सोनवणे कुटुंबाचा सर्व संसार उध्वस्त झाला. हया कुटुंबात मुलगा आणि आईच वास्तव्यास आहे. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच साईसमर्पण फाऊंडेशन संगमनेर यांच्या वतीने सोनवणे कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य स्टील भांडी,कपडे, किराणा किट, गॅस शेगडी,धान्य कोठी, सतरंजी,फँन आदी साहित्य भेट देत मदत कार्य केले.
मदत देण्यात विशेष बाब म्हणजे साई समर्पण फाऊंडेशनचे समन्वयक फार्मसिस्ट संतोष नाईकवाडी यांच्या सोनु व मोनु या दोन जुळ्या मुलांचा वाढदिवस होता मात्र त्यांनी हा वाढदिवस रद्द करुन त्याऐवजी सदरची रक्कम ही या कुटुंबासाठी मदत कार्यात दिली आहे.
साईसमर्पण फाऊंडेशनचे डॉ. संदीप अरगडे ,संदीप सातपुते, आशिष ताजणे ,दत्तात्रय घोलप , सिस्टर लीला कोटकर, संतोष नाईकवाडी, डॉ.संदीप गुंजाळ,सौ पुनम खांडरे मॅडम, दर्शन खालकर, आप्पासाहेब चत्तर आदी समन्वयक उपस्थित होते.
यावेळी रायतवाडीचे सरपंच सतिश तनपुरे, रायतेचे उपसरपंच सुरज कैलास पानसरे, दिलीप तनपूरे, सुयोग कोटकर,राहुल शिरतार , अर्जून शिरसाठ,ज्ञानदेव कोटकर,संतोष गोर्डे आदीजण उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील इतर सेवाभावी संस्थां व शासकीय पातळीवरही हया परिवाराला मदत करावी असे अवाहन यावेळी साईसमर्पण फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button