आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०२/०४/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १२ शके १९४७
दिनांक :- ०२/०४/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४२,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २३:५०,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति ०८:५९,
योग :- आयुष्मान समाप्ति २६:५०,
करण :- बव समाप्ति १३:०८,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- मंगळ – कर्क २५:२५,
शुभाशुभ दिवस:- स. ०८नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३३ ते ०२:०५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२४ ते ०७:५६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५६ ते ०९:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:०१ ते १२:३३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१० ते ०६:४२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
कल्पादि, विष्णूचा दोलोत्सव, हयव्रत,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १२ शके १९४७
दिनांक = ०२/०४/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
खाण्यावर बेताने ताव मारा. विद्यार्थ्यांसमोर नवीन संधि चालून येईल. शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
वृषभ
धार्मिक गोष्टीत प्रगती कराल. हवामानानुसार काही बदल करावेत. महत्त्वाची कामे पार पडतील. प्रामाणिकपणा व सचोटी सोडू नका. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल.
मिथुन
उपासनेमुळे काही त्रास कमी होतील. काही क्षणिक आनंद घ्याल. जबाबदारी सक्षमपणे पेलाल. निर्धास्तपणे वागू नका. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.
कर्क
जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वडीलधार्यांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक नाराजी दूर करावी. सार्वजनिक कामात कौतुक केले जाईल. नोकरदारांनी नरमाईची भूमिका घ्यावी.
सिंह
योग्य अयोग्याची शहानिशा करावी. भावनेच्या आहारी जाऊ नका. कलाकारांच्या कलेचे कौतुक केले जाईल. सांधेदुखीचा त्रास संभवतो. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.
कन्या
धीर व संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. चारचौघांत कौतुक केले जाईल.
तूळ
भावंडांशी वादाचे प्रसंग संभवतात. सारासार विचारातून कृती करावी. देणी फेडता येतील. सासुरवाडीकडून शुभवार्ता मिळेल.
वृश्चिक
अधिक कष्टाची गरज पडेल. गणेशाची उपासना करावी. वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. मनोरंजनाचे बेत आखले जातील. विरोधकांची संख्या वाढू शकते.
धनू
घरातील ताणतणाव दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मानावा. कोणतेही टोकाची भूमिका घेऊ नये. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. धार्मिक कामात मन गुंतवावे.
मकर
लेखन कलेला वाव मिळेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे. घरातील कामात गुंग व्हाल. नवीन मित्र जोडावेत. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
मीन
छंद जोपासायला वेळ द्या. अधिकारी व्यक्तींचा वेळोवेळी सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सडेतोडपणे मत मांडाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर