बबनराव पाचपुते यांच्या निधीतून चिखली गावच्या मुख्य रस्त्या साठी 20 लाखाचा निधी!

चिखलीकरांची फरफट थांबणार!
दत्ता ठुबे
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावात जाणार्या मुख्य रस्त्याचा प्रश्न बर्याच वर्षापासुन रखडलेला होता. त्या रस्त्याचा प्रश्न श्रीगोंदा-नगर मतदार संघाचे आमदार श्री.बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या आमदार निधीतुन लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन दिले असुन त्यासाठी २० लक्ष रुपये निधी या रस्त्यासाठी दिला आहे.
चिखली गाव हे नगर-दौंड रस्त्यावरील मोठ्या लोकसंख्येचे गाव असून त्या गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता होता बर्याच दिवसापासून रहदारी व वाहतूक याच रस्त्याने होत होती या अगोदर या रस्त्याचे मुरमीकरण होऊन ही पावसाळ्यात रस्ता खराब होत होता यामुळे येथिल गावातील ग्रामस्थांना ये जा व रहदारी करण्यासाठी प्रचंड अडचण होत होती प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही प्रशासनाने याकडे कधीही लक्ष दिले नाही मात्र बर्याच दिवसांपासून मा.ग्रा.सदस्य लालासाहेब करपे व श्रीगोंदा तालुका भा.ज.पा. चे सरचिटणीस श्री. ऋषिराज अनिल चौधरी सह ग्रामस्थांनी आमदार पाचपुते यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर या रस्त्याची अडचण घातली आणि तत्काळ आमदार बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतुन २० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्याचे आश्वासन दिले यामुळे चिखली गावच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असुन यामुळे चिखली ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे यासाठी ग्रामस्थांनी आमदार बबनराव पाचपुते यांचे आभारही मानले…