पृथ्वीसह संपूर्ण विश्व भगवंताच्या पावन कमल चरणांनी व्यापलेले आहे – प.पू.श्री राधाकृष्णजी महाराज

संगमनेर शहरात भक्तिमय वातावरनांत भव्य शोभायात्रा
संगमनेर प्रतिनिधी
भगवान नृसिंहांचे प्राकट्य स्थान मुलतान येथे आहे. मुलतान सध्या पाकिस्तान मध्ये आहे. मुलतानी माती ही देवाच्या चरणांची धूळ आहे. भगवान विष्णूचे एक पाऊल पृथ्वीवर, दुसरे स्वर्गात आणि तिसरे पाऊल राजा बळीच्या डोक्यावर आहे. ही पृथ्वी राम अवतार ,कृष्ण अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार आदिच्या अवतार कार्याने व्यापली आहे. मुलतान हा भारताचा भाग आहे,
परंतु राजकीय कट कारस्थानाने तो पाकिस्तानचा भाग झाला. केवळ भारतवर्ष नव्हे तर संपूर्ण विश्व भगवंताच्या कमल चरणांनी व्यापले आहे, हा परिसर पंचवटीचा आहे, नाशिक पंचवटी परिसरात जानकीजीं सोबत रघुनाथजी वसले होते. संगमनेर यातून थोडे तरी सुटले असेल का ? भगवान रामजी आणि माता जानकी यांचे चरण कमल अमृतवाणी असलेल्या प्रवरेच्या तीरावर विराजीत झाले होते. त्यांचे चरणरज याच तटावर पडले हा माझा दृढ विश्वास आहे. मी आत्मविश्वासाने सांगतो की, भारतातील प्रत्येक प्रदेश भगवंताच्या चरणस्पर्शाने पवित्र झाला आहे असे मौलिक प्रतिपादन गो- वत्स प. पू. श्री राधाकृष्णजी महाराज यांनी व्यक्त केले.
शहरातील मालपाणी लॉनमधील येथे श्रीराधाकृष्ण जीं महाराजांच्या अमृतवाणी तून १ ते ९ एप्रिल दरम्यान श्रीराम कथा होत आहे. या कथेचा आरंभ आज करण्यात आला त्यावेळी भगवंत अस्तित्वाची शाश्वतता असल्याचे अनेक दाखले देत अमृतवर्षा प्रमाणे आपल्या अमोघवाणीतून भक्तगणांना सौदाहरणसह दाखले त्यांनी दिले.
हा परिसर पंचवटीचा आहे, नाशिक पंचवटी परिसरात जानकीजीं सोबत रघुनाथजी वसले होते. संगमनेर थोडेसे सुटले असेल का ? भगवान राम आणि माता जानकी यांचे चरण अमृतवाणी असलेल्या
प्रवरेच्या तीरावर विराजीत झाले होते. त्यांचे पावन चरण कमल याच तटावर पडले हा माझा दृढ विश्वास आहे. मी आत्मविश्वासाने सांगतो की, भारतातील प्रत्येक प्रदेश भगवंताच्या चरणस्पर्शाने पवित्र झाला आहे. . कोणताही इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, , शास्त्रज्ञ, पुरातत्व तज्ज्ञ यावर विश्वास ठेवू शकेल अथवा ठेवणार नाही. माझ्या मनातील विश्वास दृढपणे सांगतो की भारतासह संपूर्ण विश्वाच्या भूमीचा एकही भाग किंवा कोपरा प्रभूच्या चरणकमला पासून दूर राहिला नाही. जिथे जिथे भगवंताचे पाय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पडले आहेत, ती भूमी पवित्र झाली. हरीची स्तुती न करणे,भजना शिवाय सत्संग करणे आणि सत्संगा शिवाय भोजन करणे योग्य नाही. कारण ते आमच्या हक्काचे नाही, अधिकाराचे नाही ते चोरीचे भोजन आहे. भगवंताच्या नामस्मराने भोजन स्वादिष्ट बनते. भोजनात स्वाद आला तर ती इमानदारीने कमाई केलेल्या रोटीचा आस्वाद होईल असे सांगत. गोमातेला वंदन करून, कथेला आरंभ केला. ते म्हणतात महाराष्ट्रातील सर्व संत परंपरांना, वैष्णव इत्यादी सर्व संतांच्या चरणी नमस्कार करतो. कवी महर्षि वाल्मिकी, महान संत गोस्वामी तुलसीदासजी , भगवती तुलसी महाराणी, वंदन रून जेव्हा मला कोणत्या वाक्याने कथा कशी सुरू करावी असा प्रश्न पडतो, तेव्हा मला फक्त एकच शब्द आठवतो, तो म्हणजे, आज आनंदी आनंद झाला किंवा याशिवाय इतर कोणत्याही क्षणाचा मी विचार करू शकत नाही.
आनंदाच्या अवस्थेत हरीचे गुणगान केल्याने आनंद आनंदच राहत नाही तर तो परमानंद बनतो आणि परमानंदात देवाचा अनुभव होतो. देव आपल्या आत आहे. हरी भक्तांवरील प्रेमामुळे, मी ही कथा सांगण्याचे धाडस करतो. शंभर कोटींहून अधिक रामायण आहेत ज्यांच्या कथा गायल्या जाऊ शकतात आणि भगवान रामाचे गुण प्रकट करता येतात. प्रेमाच्या शक्तीने, वाणी देवाची सेवा करत आहे. या नऊ दिवसांच्या कथा यात्रेत, जर एखाद्याला एका दिवसासाठीही भगवान श्रीरामांचा अनुभव घेता आला, तरच रामकथा अर्थपूर्ण सार्थक झाल्याचे होईल असेही प पू श्री राधाकृष्णजी महाराज म्हणाले.
प्रभात फेरी हरिभक्ताचे केले कौतुक
नियमितपणे प्रभातफेरी करणाऱ्या हरिभक्तांचे कौतुक करताना, राधाकृष्णजी म आवर्जून म्हणाले की, दैनंदिन साधना करणा-या परम भक्ताला आणि त्यांच्या साधनेला नमन करतो, संगमनेर येथील सर्व प्रेम करणारे सर्व भक्तगणास नमन करतो. तुमच्या आशीर्वादाने, मी रामकथेची सुरुवात एका शुभ मुहूर्तावर करत आहे. प्रेमीजनच वाट पाहू शकतात. प्रत्येक कथेची स्वतःची परिस्थिती असते. ही कथा प्रत्येकासाठी सर्वकाही आहे. भगवतकथा आणि रामकथेचा विचार मंच पवित्र झाले आहे . या अंतरिक्षात, ब्रह्मांडात, विश्वात देवाचे अस्तित्व आहे असे राधाकृष्णजी म. म्हणाले
शोभायात्रा ठरली खास आकर्षण
१ एप्रिलपासून, नऊ दिवस परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराजांच्या मुखातून श्री रामकथा कथन केली जात आहे. यानिमित्ताने संगमनेर शहराच्या विविध भागातून ढोल-ताशांच्या गजरात आणि सनई चौघधराच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीने संपूर्ण संगमनेर शहर भक्तिमय वातावरणाने भरून गेले होते. भव्य मिरवणुकीची सुरुवात सनई चौघडाच्या नादात झाली. ज्यामध्ये “प्रभु रामचंद्रांचा विजय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय” अशा घोषणा देण्यात आल्या.
या शोभायात्रेत महिला भगिनींनी डोक्यावर तुळशी ठेवून हरिनाम घेत सहभाग घेतला. शहरातील चंद्रशेखर चौकातील श्री राम मंदिरापासून ही भव्य मिरवणूक सुरू झाली आणि बाजरपेठ, लाल बहादूर शास्त्री चौक नगरपालिका, तेली खुंट मेनरोड, विठ्ठल मंदिरात समारोप करण्यात आला.
माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनी राधाकृष्ण महाराजांचे केले स्वागत
— शोभायात्रेच्या सुरुवातीच्या संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात राधाकृष्णजी महाराजांच्या शुभहस्ते भगवान श्रीरामाची आरती करण्यात आली.
माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनी राधाकृष्ण महाराजांचे स्वागत करून आरतीसह मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद लुटला.
नीलम खताळ यांनी घेतला पालखी फुगडीचा खेळण्याचा घेतला आनंद
आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ या मिरवणुकीत सहभागी होत पालखी खांद्यावर घेऊन महिला भाविकांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही घेतला.
नऊ दिवस असणार रामकथा
या श्रीरामकथेत पहिल्या दिवशी श्री रामकथेचे महात्म्य, दुसऱ्या दिवशी शिव पार्वती विवाह, तिसऱ्या दिवशी श्रीराम जन्मोत्सव, चौथ्या दिवशी बाल लीला आणि धनुष यज्ञ, पाचव्या दिवशी श्री राम लाल आणि माता जानकी यांचा भव्य विवाह सोहळा होईल, तर संध्याकाळी मिरवणूक हे मुख्य आकर्षण असेल, सहाव्या दिवशी वनवासाची कथा, सातव्या दिवशी श्री राम भरत शबरीला भेट, आठव्या दिवशी रामचरित्र लंका विजय, नवव्या दिवशी श्री प्रभु श्री रामांचा राज्याभिषेक नंतर रामकथेचा समारोप होईल.