शब्दगंध च्या राज्य अध्यक्षपदी राजेंद्र उदागे, तर कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.अशोक कानडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षपदी राजेंद्र उदागे,खजिनदारपदी भगवान राऊत यांची फेरनिवड तर कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.अशोक कानडे,कार्यवाहपदी सुभाष सोनवणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.

शब्दगंध साहित्यिक परिषदेची त्रिवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोहिनूर मंगल कार्यालय,अहमदनगर येथे पार पडली,त्यावेळी राज्य कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.
राजेंद्र उदागे गेल्या वीस वर्षापासून शब्दगंधशी जोडलेले असुन तिसऱ्यांदा त्यांची सर्वानुमते निवड झाली आहे.चंद्रकांत पालवे,प्रा.मेधाताई काळे, प्रा.मधुसूदन मुळे,प्राचार्य जी.पी.ढाकणे,ज्ञानदेव पांडुळे,संस्थापक सुनील गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवड झालेले राज्य कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे
अध्यक्ष राजेंद्र उदागे,सचिव सुनील गोसावी,खजिनदार भगवान राऊत,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे,कार्यवाह सुभाष सोनवणे,सहकार्यवाह अजयकुमार पवार,उपाध्यक्ष शाहिर भारत गाडेकर(पाथर्डी), उपाध्यक्षा प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे(श्रीरामपूर), सहसचिव प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर(आष्टी), सुनीलकुमार धस(नेवासा), प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड(राहाता), राज्य संघटक शर्मिला गोसावी, सल्लागार तथा संयोजन समिती अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, राज्य कार्यकारणी सदस्य किशोर डोंगरे,राजेंद्र पवार, रामकिसन माने (शेवगांव),स्वाती ठुबे (पारनेर),बबनराव गिरी (कडा),जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुनीलकुमार सरनाईक(कोल्हापूर), सिराज शेख(बीड), श्रीनिवास गोरे,स्वाती राजेभोसले(पुणे), डॉ.शेषराव पठाडे,डॉ.गणी पटेल(औरंगाबाद), रा.चि.जंगले(ठाणे), भानुदास वाघमारे(बदलापूर), सरोज आल्हाट,विलास कातकाडे (नाशिक), रिता जाधव(मुंबई), प्रभाकर सूर्यवंशी(धुळे), प्रा.गणेश लेंगरे(सोलापूर), प्रकाश धादगिने(लातूर), डॉ.रमेश वाघमारे(गडचिरोली), सुभाष वरुडकर(अकोला), गौतम निकम(जळगाव), सल्लागार मंडळामध्ये आमदार कविवर्य लहू कानडे,प्राचार्य शिवाजीराव देवढे,चंद्रकांत पालवे,कॉ.बाबा आरगडे,अड्ड.सुभाष लांडे पाटील, डॉ.जी.पी.ढाकणे,डॉ.शंकरराव चव्हाण,प्रा.कॉ.स्मिता पानसरे,प्राचार्य चंद्रकांत भोसले व प्रमोद देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.