श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने पाथर्डीत भव्य शोभायात्रा
पाथर्डी प्रतिनिधी
श्रीरामनवमी निमित्ताने हिंदू रक्षा युवा मंच,
श्रीराम नवमी उत्सव समीतीच्या वतीने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे
रविवार दि १० रोजी वामणभाऊ नगर येथील स्वामी समर्थ मंदिर येथून सायं.४:०० वा. भव्य दिव्य शोभायात्रा व पालखी निघणार आहे तर सोमवार दि. ११ एप्रिल रोजी प्रसिद्ध व्याख्याते न्यायमूर्ती मदनजी गोसावी, श्रीजी भाईजी, मदनजी रस्तोगी, अमीतजी शौचे या राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध मान्यवरांचे व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व संत
महंत उपस्थित राहणार आहेत तरी रामभक्तानी या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत भव्य श्रीराम मंदिराचे काम प्रगती पथावर आहे. गेल्या
२ वर्षांपासून कोविड २०१९ च्या प्रतिबंधामुळे शोभायात्रा काढता आली नाही, मात्र श्रीरामनवमी जन्मोत्सव मोजक्या श्रीरामभक्तांच्या
उपस्थितीत पार पडला. कोविडच्या २ वर्ष कार्यकाळात हिंदू रक्षा युवा मंचच्या वतीने शहर व तालुक्यात धार्मिक व सेवा कार्याद्वारे रक्तदान शिबीर. भजनसंध्या आदी माध्यमातून सेवा उपक्रम राबविले. २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षीचा श्रीरामनवमी जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही
प्रभू श्रीरामचंद्राची भव्य मूर्ती हार- फुलांनी सजावट करून शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत बाल वेशभूषेत राम पंचायत देखावा, आकर्षक चित्र रथावर भव्य दिव्य रामाची मूर्ती, लेझर लाईटवर देवी- देवतांच्या प्रतिमांची डिझाईन व आकर्षक विद्युत रोषणाई, भारतमाता ढोल पथकासह, भजनी मंडळ, पारंपारिक वाद्ये, सनई चौघडे, घोडे, उंट शोभायात्रेचे आकर्षण आहे. अश्या भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळ्यात ग्रामीण व शहरी भागातील बंधू – भगिनींनी पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वामनभाऊ नगर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून सायं.४:००वा. शोभायात्रेचा प्रारंभ होणार असून मार्ग- शेवगाव रोड, आंबेडकर चौक, नाईक चौक, मेनरोड, खालचा गणपती मार्गे कसबा पेठेतील
येथील विजय हनुमान मंदिर येथे महाआरती व महाप्रसाद होईल. या मार्गात शोभायात्रेचे पुष्पवृष्टी व सडा रांगोळी व आतिषबाजीने स्वागत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.