पारनेर तालुक्याने आपला स्वाभिमान जपला–वाळुंज

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत शेवटी पारनेर तालुक्याने आपलाच स्वाभिमान जपला असे निलेश लंके प्रतिष्ठान, ठाणे शहरचे उपाध्यक्ष योगेश भास्कर वाळुंज यांनी म्हटले आहे
2024 लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. प्रसार माध्यमे आणि पारापारावर मोदी, पवार साहेब आणि नगर दक्षिण उमेदवारांच्या चर्चा सुरु झाल्या. दक्षिणेत विखे पाटील हे भाजपचे उमेदवार जवळ जवळ निश्चित होते. पण विधान सभेचा राजीनामा दिल्यानंतर निलेश लंकेची उमेदवारी जण माणसात नक्की मानली जाऊ लागली. पहिल्यापासून लंकेनी प्रचारात आघाडी घेतली होती. स्वामीनी जण संवाद यात्रेमुळे कर्जत, जामखेड,पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्याच्या गावागावात निलेश लंके पोहचले. यात्रेमध्ये गावातच राहणे, मंदिरात झोपणे या सामान्य कृती सामान्य माणसाच्या मनात घर करून गेल्या. प्रचाराच्या त्या दोन महिन्यात निलेश लंके तालुक्यात विशेष फिरले नाहीत. पण कौटुंबिक प्रतिनिधी दीपक अण्णा आणि राणीताई लंके हे मात्र तालुक्यात लक्ष देऊन होते.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्यात मात्र उत्साहाचे वातावरण होते पण ते कुणाला दाखवता आले नाहीं. सामान्य माणसाने नेत्यांना मतदान करण्याचा मनोमन निर्णय मात्र घेतलेला होता.
पण याच काळात तालुक्यातील उत्तरेच्या तुकड्या वरील एक फौज निलेशजी लंके यांच्या वर तुटून पडली होती. आपल्या तालुक्याचा माजी लोक प्रतिनिधी असतानाही नको ते आरोप अगदी कानाला ऐकण्यास नको वाटणारे आरोप रिचार्ज वाल्यानी केले.हे खूप अति होतंय हे जनतेला माहिती होते. पण यांना कोणीही प्रतिउत्तर केले नाही.अगदी नेत्यांनी सुद्धा या डफडे वाल्यांकडे दुर्लक्ष केले. एक शब्दाची प्रतिक्रिया न देता यांचे महत्व वाढू दिले नाही.
लोकनेते निलेश लंके यांच्यावर कितीतरी आरोप केले.तालुक्यातील जनतेने मात्र मनाशी नक्की ठरवले होते कि यावेळी मतदान करणार तर ते या तालुक्याच्या सुपुत्राला,
हा तालुका इंग्रजाविरुद्ध लढलेल्या सेनापती बापटांचा तालुका आहे. यावेळी हा तालुका धनशक्ती विरोधात लढल्या शिवाय राहणार नव्हताच. त्यामुळेच तालुक्याने दिलेल्या 35 हजारांच्या मताधिक्याने नेत्यांचा विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला,
म्हणून कोणी काही म्हणाले, कोणी काही आरोप केले तरी पारनेर तालुक्याने आपला स्वाभिमान जपलाच हे कुणीही नाकारू शकत नाही.असे
योगेश वाळुंज यांनी म्हटले