राजुर पोलीस स्टेशन चे गणपती विसर्जन उत्साहात!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
राजूर पोलीस स्टेशन च्या श्री गणेशाची आज मोठ्या उत्सहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली या वेळी सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणारे पोलिसांचे पाय आज मात्र ब्रॉस बँड च्या गाण्यांवर मनसोक्त थिरकताना दिसले.
सहकाऱ्यांनी आपले पोलीस आधिकारी दीपक सरोदे व त्यांचे सहकाऱ्यांनी मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला या वेळी सर्व पोलीस कर्मचारी टी-शर्ट परिधान करून राजूर शहर वासियांचे आकर्षण करून घेत होता. राजूर पोलीस स्टेशन च्या गणेशाची आज मोठ्या उत्सहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली

या वेळी सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणारे पोलिसांचे माजी आदर्श सरपंच सौ हेमलताताई पिचड यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या तसेच सौ पुष्पाताई लहामटे यांनी स्वागत करत गणरायाच्या निरोपाच्या मिरवणुकीत गाण्यांच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी राजूर शहरातून मिरवणूक काढत महा आरतीने विसर्जन करण्यात आले.