दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार महासंघाचे वतीने राज्यातील सहकार चळवळ वाचविण्यासाठी दि. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता अॅड.सतीष तळेकर यांचे अध्यक्षतेखाली सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार महासंघाचे निमंत्रक
माजी आमदार माणिकराव जाधव व सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे
यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार महासंघाचे वतीने सह्याद्री लॉन्स (पटेल लॉन्स), बीड बायपास रस्ता, कमल नयन बजाज हॉस्पीटल जवळ, संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे शुक्रवार दि.२८ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता हा शेतकरी मेळावा होत आहे.
राज्यातील ४९ सहकारी साखर कारखान्यावर राजकारणी लोकांनी कब्जा केलेला आहे. २० कारखाने कब्जात घेण्याच्या तयारीत आहेत. ३६ सहकारी साखर कारखाने गेली १५ ते २० वर्षापासून बंद ठेवण्यात आलेले आहेत. शेतकरी व कामगारांना बेरोजगार करण्यात आलेले आहे. कामगारांचे थकीत वेतन व सेवानिवृत्तीचे लाभ दिले जात नाहीत. यामुळे शेतकरी व कामगार खूप मोठ्या संकटात सापडले आहेत. या संकटला वाचा फोडण्यासाठी व शासनाला जाब विचारण्यासाठी वरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेंव्हा शेतकरी व कामगारांनी शेकडोच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन माजी आ.विक्रम सावंत (जत-सांगली), माजी आमदार धर्माजी सोनकवडे, माजी आमदार मनोहर पटवारी, नानासाहेब पाटील, उत्तमराव राठोड, ऍड . कृष्णा जाधव,जयाजीराव सूर्यवंशी (औरंगाबाद), सुरेश पवार, यशवंत आहेर, संजीव पाटील, विजय केशेट्टीवार,श्री. धर्मपाल, लक्ष्मणराव आवाळे, जरंडेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शंकरराव भोसले,किसनराव घाडगे, मुकुंदराव चौधरी, नामदेवराव ताकवगे, टिळक भोस (जगदंबा,अहमदनगर), साहेबराव मोरे, रामदास घावटे, बबनराव कवाद (पारनेर अहमदनगर), ज्ञानेश्वर भांदरगे, अंकुशराव देशमुख, प्रल्हाद हेकाडे, लक्ष्मण घोडके, अरूण वझरकर (जालना स.सा.का.) डॉ. शंकरराव पडसाळगे, संजय जेवरीकर, गुलाबराव धानूरे, एस. बी. पाटील (किल्लारी एस.एस.के.) नामदेव शिंदे, व्ही. एन. भांगे ( अंबा साखर, बीड.), गणेश आहेरकर, अशोक डक, बी.एस. काळे (पाथरी एस. एस. के. परभणी), राजन चौधरी (जिजामाता एस. एस. के. बुलढाणा.) चंद्रकांत डोंगरे, गोविंद सावंत, राजा सिंदाळकर (जय जवान जय किसान एस.एस.के.) कृष्णा मोहिते, तुकाराम चव्हाण, शहा मामू (कन्नड एस.एस.के.) व नेश्वर पाटील (विनायक एस.एस.के. वैजापूर, औरंगाबाद), सुभाष आढाव, हमीदभाई, रघुनाथ कळसकर, बाबूराव तंवर, ज्ञानदेव मगर (संत एकनाथ एस.एस.के., औरंगाबाद.), नवनाथ साबळे (कडा एस.एस.के.) शिवाजी सावणे (बागेश्वरी स.सा.का. परतूर-जालना), कुबेर जाधव ( वसाका नाशिक), शिवाजी संकपाळ, सुजीत पाटील, पांडूरंग राऊत, नंदू जाधव, भागवत – जाधव, गोविंद पंखे (संतनाथ एस. एस. के. सोलापूर- बार्शी), बालाजी संपतराव, बी. एस. भागानगरे, बी. बी. जाधव (कलंबर नांदेड एस.एस.के.), अँड. आत्माराम लहाने, प्रा. विष्णू गाडेकर, अंबादासराव जाधव (देवगिरी एस. एस. के. फुलंनी औरंगाबाद.) व इतर असंख्य शेतकरी-कामगार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत . राज्य कारखाना बचाव समितीच्या वतीने साखर कारखानानदारीशी संबंधीतांनी
मेळाव्याला उपस्थीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .