गणोरे परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले….

.
सुशांत आरोटे
गणोरे प्रतिनिधी
गणोरे ता.अकोले येथे मधल्या काही काळापासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत.काही दिवसांपूर्वी अकोले रोड तसेच देवी गल्ली परिसरात आठ ते साडे आठ वाजता चोर आले होते परंतु ते आंधराचा फायदा घेत पळाले होते.तेव्हा पासून जे चोरीचे सत्र सुरू झाले आहे.तसे ते आज संध्याकाळी अकोले रस्त्यालगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी विद्यालयाजवळ मोटार सायकल ची चोरी होता होता वाचली., गाडीचा हँडल लॉक असल्याने आणि तो तोडता न आल्याने गाडी चोरी वाचली.
सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजीविद्यालया जवळ असणाऱ्या एका शिक्षकाच्या घरासमोर असणाऱ्या गाडी म्हणा अथवा इतर चोरीच्या उद्देशाने तिघे चोर मोटासायकल वर आले, त्या पैकी दोन चोर गाडी घेऊन रस्त्यावर थांबले, त्या तिघांपैकी एक जण हळूच घराच्या ओट्यावर जाऊन दरवाजातून आत डोकावून पडदा दूर करून खात्री केली की सगळे झोपलेले आहे. याच संधीचा फायदा घेत चोराने प्रथम गाडीचा हँडल ला झटका मारला, परंतु त्यात अपयश आले असता त्यांनी मग हळू हळू गाडीचा एक एक पार्ट खोलायला सुरुवात करत गाडीचे दोन्ही आरशे, सहा लिटरच्या आसपास असलेले पेट्रोल, मड गार्ड, जे जे खोलने शक्य आहे ते ते सर्व खोलून गावच्या दिशेने पसार झाले. परंतु जवळ कॅमेरा असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपली तोंडे विरुद्ध बाजूला करून तेथुन पळ काढला.परंतु गणोरे गावच्या म्हणजेच ग्रामपंचायत आणि इतर नागरिकांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होईल बहुतेक ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी गणोरे वरून पिंपळगाव निपाणी ला जाणार मधला रस्त्याने पळाले असून लवकरच ते अकोले पोलीस यंत्रणेच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
आठवडा भरात गणोरे आणि परिसरात अनेक गाड्यांचे पेट्रोल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून छोट्या छोट्या चोरींकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने कदाचित मोठी चोरी अथवा दरोड्यांसारखे प्रकार ही होऊ शकतात. मधल्या काळात गावातील एक मोटार सायकल चोरांनी चोरून नेऊन नदीला टाकून दिली, कारण गाडीला ब्रेक नसल्याचे लक्षात आल्याने आणि गाडीला क्लच नसल्याने गाडी वाचली. अश्या अनेक छोट्या छोट्या चोऱ्या परिसरात वाढल्याने संशयाचे वातावरण आहे.
अगदी काही दिवसांवर परिसरात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी गणोरे येथील अंबिका माता यात्रा उत्सव सुरू होणार असून दोन वर्षानंतर पुन्हा एकदा जत्रा सुरू परिसरातील सुरू झाल्याने यात्रा काळातही गाड्या आणि पेट्रोल चोरीच्या घटना वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.तमाशांमधून अनेक गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.पूर्वीचे अनुभव पाठीशी आहेतच. गणोरे गावाची जत्रा महणजे तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र भर नावाजलेले जत्रा असते . सर्वात मोठी आणि शेवटची यात्रा म्हणून अंबिका माता मंदिर गणोरे गावाची जत्रा प्रसिद्ध असल्याने संपूर्ण महाराष्ट्र भरातून लोक दर्शनासाठी येत असतात. अंबिका माता जत्रेतील दारू गोळा आतषबाजी आणि तमाशा संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रिय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत अपुऱ्या पोलीस कर्मचारी वर्गावर प्रचंड ताण येत असतो. म्हणून पोलीस यंत्रणेने देखील पुन्हा एकदा गावागावात ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करून ॲक्टिव करणे अत्यंत गरजेचे बनले आहेत. गणोरे आणि पंचक्रोशीत अकोले पोलीस तसेच संगमनेर पोलीस विभागाची गाडी पेट्रोलिंग साठी येत असायची परंतु पोलिसांच्या गस्ती पथक पुन्हा एकदा या विभागात येणे गरजेचे झाले आहे.म्हणजे या चोरांना आळा बसेल.