इतर

रेशन घोटाळ्यातील आरोपींना अटकपूर्व जामीनास नकार ….

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वडनेर येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी शासकीय धान्य वितरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता . या प्रकरणातील आरोपींना तात्पुरता जामीन देण्यास खंडपीठाने नकार दिला . वडनेर येथील लोकजागृती सामजिक संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय पवार यांनी येथील स्वस्त धान्य दुकानदार भागा खंडू बाबर यांच्यासह दोघांना काळ्याबाजारात रेशनचा गहू विकताना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते . पुढे या दुकानदाराने तत्कालिन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांच्याशी हातमिळवणी करून प्रकरण दडपले होते . आपण केलेली तक्रार दडपल्याची दडपली जात असल्यामुळे पवार यांनी प्रशासानाकडे पत्रव्यवहार केला पण काही उपयोग झाला नाही . म्हणून पवार यांनी या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात या अधिकाऱ्यांविरोधात मॅन्डॅमस याचिका दाखल केली होती . पुढे उच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले . त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार भागा खंडू बाबर व चोरीचा माल विकत घेणारे भाऊसाहेब विठ्ठल गोरडे व रामदास मारुती कापसे यांच्याविरुद्ध जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता . याबाबतची फिर्याद पारनेरचे पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली .
यातील आरोपींनी अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात अर्ज केला होता परंतु तो फेटाळण्यात आल्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता . नुकताच न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे . त्यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे . या जामीन अर्जात मुळ तक्रारदार असणारे दत्तात्रय पवार यांनीही वकील दत्तात्रय मरकड यांच्यातर्फे हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता . दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमुर्ती यांनी एस . जी . मेहेरे यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला . सरकार पक्षाच्या वतीने वकील पी . व्ही . डिग्गीकर यांनी बाजु मांडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button