इतर

अवघ्या नऊ वर्षाचा  मंथन बांडे  पोहून पार करणार १५ कि. मी. चे  सागरी अंतर !

 

 अकोले प्रतिनिधी

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) विक्रोळी (मुंबई) येथील रहीवासी व मूळ अकोले तालुक्यातील खडकी खुर्द येथील मुरलीधर बांडे यांचा मुलगा मंथन मुरलीधर बांडे (वय ९) हा जलतरणपटू अटल सेतूपासून

गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचे सुमारे १५ किलोमीटरचे सागरी अंतर पोहून अनोखी मानवंदना देणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समता, शिक्षण, आत्मसन्मान व प्रगतीसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून मंथन जलतरण मोहिमेच्या माध्यमातून त्यांना अनोखी मानवंदना देणार आहे. हे केवळ एक सागरी आव्हानच नाही तर त्यामागे त्यांच्या विचारांची उजळणी करणारी भावना असल्याचे वडील मुरलीधर बांडे यांनी स्पष्ट केले. यासाठी मंथन यास समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंथन हा विक्रोळी येथील एमपीएस हरियाली व्हिलेज सीबीएसई

स्कूलमधे ५ वी इयत्तेत शिकत आहे.लहानपणापासूनच जलतरणाची त्यास विशेष आवड आहे. त्याने

यापूर्वी मुंबई मालवण येथील १४ व्या राष्ट्रीय

सागरी जलतरण स्पर्धेत सहभाग घेऊन लक्षणीय यश संपादन केले. कमी वया प्रदीर्घ सागरीजलतरण अनुभव ही मंथनची खासियत आहे. वयाच्या ७ व्या वर्षापासून तो सागर व तलावात पोहण्याचा सराव करतो. जलतरण क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण व कठोर परिश्रमाच्या जोरावर मंथनने आतापर्यंत आपले साहसी कर्तृत्व सिद्ध केले.

महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नवव्या वर्षीच तो अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे सुमारे १५ किलोमीटर सागरी अंतर पोहून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विक्रोळी जलतरण तलावात त्याचा सराव सुरू आहे.

——–////—–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button