देऊळगावराजा : तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित सदर छोटेखानी
कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक श्रीकृष्ण बंगाळे होते, श्री बंगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय
भाषणात वीर सावरकर यांच्या जीवनाविषयी माहिती विशद केली
याप्रसंगी श्रीकृष्ण बंगाळे, देविदास पठाडे, सुमनबाई पठाडे, सुनंदा बंगाळे, प्रेम बंगाळे,छगाबाई पठाडे, यश बंगाळे, गजानन बंगाळे, श्रेयस पठाडे, शरयू बंगाळे,
आदीश्री बंगाळे उपस्थित होते सूत्रसंचालन मेहेर बंगाळे यांनी केले तर वाचनालयाचे अध्यक्ष भगवान मुंढे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.