इतर

नाशिक मध्ये सामाजिक समता सप्ताह”निमित्ताने स्वच्छता मोहिमेचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी

डॉ. शाम जाधव

नाशिक – आज दिनांक १३/४/२०२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे. अंतर्गत “सामाजिक समता सप्ताह”निमित्ताने समतानगर,आगार टाकळी रोड , नाशिक,येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक शहरात समता नगर उपनगर, दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता समतानगर, आगर टाकळी रोड ,नाशिक येथील वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

सदर ठिकाणी सकाळी ९ ते १० या वेळेत स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर सर्व सामाजिक न्याय भवन परिसरात सकाळी १० ते ११ या वेळेत स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबविण्यात आला.



या उपक्रमात सामाजिक न्याय विभागचे सहा.आयुक्त श्री. देविदास नांदगावकर , अधीक्षक तिदमे , तसेच सर्व समतादूत ,मंगला मोरे, लता काळे, रुपाली आढाव, नम्रता इंगळे सुनील पागे,सोळस सर, शिल्पा मालपूरे, शालिनी काळे, सुजाता वाघमारे, शुद्धोधन तायडे. तसेच समाजकल्याण कार्यालयाचे समाजकल्याण कर्मचारी लक्ष्मीकांत पाटील सर, कापडणीस मॅडम, लोखंडे मॅडम, दंडवते मॅडम, भारती पवार मॅडम, लता गोमलाडू मॅडम, समन्व्यक शेख सर, चेतन महाले आदी सर्व उपस्थित होते. सर्व कर्मचारी, क्रिस्टलचे संगीता भालेराव, उषा खरात, पल्लवी खरात,कांबळे ताई, मनीषा रोकडे, योगिता पगारे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सांगता शपथ घेऊन करण्यात आली . शपथ वाचन अधिक्षक अनिल तिदमे यांनी केले.

हा सामाजिक उपक्रम असल्यामुळे समतानगर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ . राजेश साळुंके, श्री.साळवे व इतर सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button