
अकोले प्रतिनिधी
अविरत परिश्रम केल्याने स्पर्धा जिंकता येते असे प्रतिपादन अकोले चे गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी केले
श्री रामदास हायस्कूल बेलापुर विद्यालयात सदिच्छा भेट प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते
.विद्यालयातील इयत्ता ६ वी तील कु.अथर्व उमाजी गोंदके याची जवाहर नवोदय प्रवेश पात्रता परिक्षेत तालुक्यात द्वितीय क्रमांकाने निवड झाल्याबद्दल पालकांचा सत्कार करण्यात आला.अभ्यासातील सातत्य आणि अचुकता यावर यश नक्कीच मिळवता येते.करोना महामारी च्या काळातही विद्यालयाने उत्तुंग यश मिळवल्या बद्दल विद्यालयातील सर्व सेवकांचे कौतुक करण्यात आले तसेच पुढील वर्षीही याच प्रमाणे विद्यालयाने उत्तुंग यश मिळवावे अशा शुभेच्छा अरविंद कुमावत यांनी दिल्या
या कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख उत्तमराव फंड, विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ तळपाडे ,भाऊसाहेब गंभीरे ,विठ्ठल ढुमणे, संजय उकिरडे ,शुभांगी कर्डिले, निर्मला शिंदे ,उदय भारती ,उमाजी गोंदके , संपत बगाड, प्रमोद अरोटे, आदी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन संजय उकिरडे यांनी तर आभार प्रमोद आरोटे यांनी मानले.