इतर

सेवक कामगार संघटने कडून सामाजिक लोकांना सेवक समाज गौरव पुरस्काराने सन्मानित…

सांगली – डॉ. शाम जाधव

सेवक कामगार संघटने कडून सामाजिक क्षेत्रातील लोकांना सेवक समाज गौरव पुरस्कार या कार्यक्रमात बोलताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.उमरफारूक ककमरी म्हणाले सेवक संघटित व संघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ही नोंदणीकृत कामगार संघटना असून गेली अनेक वर्षापासून सक्रिय काम करत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे विशेष करून कोणतीही मोठे नाव अथवा पाठबळ नसून या संघटनेने समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे सेवक कामगार संघटना वेगवेगळी उपक्रम राबवत असून वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांची समस्या सोडवणे तसेच त्यांचा सन्मान करत असून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित साधून मिरज मधील शेतकरी भवन इथे शेकडो च्या संख्येने जनसमूहा समोर सामाजिक काम करणाऱ्या अनेक व्यक्तींचा सेवक समाज गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले

त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार इद्रिस भाई नायकवडी, मा.सुमित दादा कदम, मा.प्रा. मोहन व्हनखंडे सर, अस्लम जमादार, प्रा.डॉ. श्रीधर शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला

त्यामध्ये योगेंद्र दादा थोरात यांनी आपल्या प्रभागामध्ये जी शाळा सुरू केली आहे त्या शाळेचे वैशिष्ट्य व कौतुक करण्यात येत असून त्यासाठी त्यांना सुद्धा सेवक समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

त्याचबरोबर सांगली येथील कोहम पुनर्वसन केंद्र, निर्धार फाउंडेशन, मदनी चारिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर मिरज मिशन हॉस्पिटल साडेचारशे कुटुंबाचा उदरनिर्वाचा त्यांचा वेतनाच्या जो लढा आहे तो यशस्वीरित्या लढत असलेल्या तेथील आरोग्य सेवकांचा माननीय सतीश वायदंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा समाज गौरव पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले त्यावेळे संघटनेचे शिलेदार मा. प्रशांत कदम,तसेच सौ.ममता कांबळे,अमोल होवाळे, मानतेश कांबळे, सौ.संगीता ताई माने, सौ.ज्योती गुरव, इम्तियाज खडीवाले, बाळासाहेब भंडारे, सौ.सना मुल्ला,सौ.निशा कदम, मोहसिन मुल्ला, स्तवन भंडारे, फरहान पकाली, सुहेल ककमरी, फजल खडीवाले आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button