शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉ धर्मराज सुरोसे यांना प्रदान

नाशिक-महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्याच सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा ” राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार ” शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे संयोजक तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ धर्मराज एकनाथ सुरोसे यांना देण्यात आला आहे.
लोकनेते अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, नाशिक येथे मा. ना. माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, मा. रविकांत तुपकर,मा. अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ महाराष्ट्र शासन, मा. खा. भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डी लोकसभा मतदार संघ, मा. आ. अमोलल खताळ, बिजमाता पदमश्री राहिबाई पोपरे, मा. विकास नवाळे उपायुक्त महानगर पालिका छत्रपती संभाजीनगर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रविवार दि. २९ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वा. प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.धर्मराज सुरोसे यांचे डॉ. ज्ञानेश्वर सानप, अध्यक्ष संजीवनी फाउंडेशन, मा.नामदार रामदास आठवले ,नामदार अतुलजी सावे, नामदार रामजी शिंदे साहेब मा.नामदार जयकुमार गोरे,नामदार राधाकृष्ण विखे, खासदार निलेश लंके,आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार रोहित दादा पवार,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रताप काका ढाकणे, हर्षदाताई काकडे,नामदेव देवा राऊत, अरुणभाऊ मुंडे,अभय आगरकर प्रा.माणिकराव विधाते,रमेश बारस्कर,तुषार भाऊ वैद्य आदी मान्यवरां वजीर भाई पठाण, गणेश रांधवणे आदी मान्यवरांनी तसेच विविध सामाजिक संस्थांनी डॉ धर्मराज सुरोसे यांचे अभिनंदन केले आहे.