बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी ,संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश नहार!

पुणे प्रतिनिधी
रविवार दिनांक -३० एप्रिल २०२३ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघ पुणे चे त्रिवार्षीक महा अधिवेशन यशस्वी रीत्या गोवर्धन मंगल कार्यलय , शनीवार पेठ, पुणे येथे संपन्न झाले.
महा अधिवेशनाचे उदघाटन श्री मन मोहन दास, जनरल सेक्रेटरी, एन ओ बी डब्ल्यू NOBW यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष गदादे, जनरल सेक्रेटरी, बोमो व श्री मोहन येनुरे, जनरल सेक्रेटरी, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश उपस्थित होते
श्री मनमोहन दास यांनी 5 डेज बँकिंग, 12 वा व्दिपक्षीय करार, जुनी पेन्शन योजना सुरू करणे, पेन्शन व फॅमिली पेन्शन अपडेशन, पूरेशी नोकर भरती करणे व वर्क लाईफ बॅलन्स ठेवणे, आऊट सोर्सींग /
ठेका पद्धत बंद करणे ई. विषयांवर मार्गदर्शन केले व अधिवेशनात दिशा ठरवून ध्येय धोरणे ठरवण्यात आली.
मुक्त चिंतन सत्रात महिला व अपंग कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन आपले विचार मांडले.बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघ, पुणे ची नवीन कार्यकारिणीची निवड महा अधिवेशनात घोषीत करण्यात आली

अध्यक्ष -श्री प्रकाश नहार
व्हॉइस चेअरमन -श्री दिनेश कुलकर्णी
जनरल सेक्रटरी -श्री महादेव शेडगे
वर्किंग प्रेसिडन्ट -सौ सारिका कोळी
सध्या जागतिक व राष्ट्रीय पातळीवर बँकिंग उद्योगात परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले आहे, विदेशातील अनेक मोठया बँकांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. याउलट भारतीय बँकिंग उद्योग एका महत्वपूर्ण कालखंडातुन संक्रमण करीत असल्याने संबधित सर्व स्तरावर एक फार मोठे अनिश्चितते चे वातावरण पहावयास मिळत आहे. सध्या भारतात खाजगी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँक व सहकारी बँका यामध्ये तीव्र स्पर्धा आहे. या सर्व वातावरणात संपूर्ण भारतातुन सदस्य उत्साहाने महा अधिवेशनास उपस्थित होते.