इतर

शब्दगंध २०२० चे वाड्मय पुरस्कार जाहिर “लॉक डाऊन”,“मनात राहणारे”,“बाप नावाची माय”,“गावकुसातल्या गोष्टी” चा समावेश


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

“पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आल्या होत्या,महाराष्ट्रातील १७२ लेखकांची पुस्तकं प्राप्त झाली होती.त्यात “लॉक डाऊन”,“मनात राहणारे”,“बाप नावाची माय”, “गावकुसातल्या गोष्टी” या ग्रंथाना राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर करण्यात येत आहेत.अशी माहिती संस्थापक सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
कवयित्री प्रा.शर्मिला गोसावी,सुभाष सोनवणे,भगवान राऊत,किशोर डोंगरे,राजेंद्र फंड,ऋता ठाकूर यांनी परीक्षण केले त्यानुसार २०२० चे “ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ” जाहिर होत आहेत.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
शब्दगंध च्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद, चर्चासत्र, कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून या “राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या होत्या.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
कांदबरी – लॉक डाऊन, ज्ञानेश्वर जाधवर,बार्शी, काव्यसंग्रह – ऋतूमितवा,तनुजा ढेरे,ठाणे, व शेते कापणीसाठी पांढरी झाली, विनोद शिंदे,अहमदनगर , गझलसंग्रह – रातराणी, राघव(पोपट वाबळे),बारामती , कथासंग्रह – गावकुसातल्या गोष्टी, डॉ.शिवाजी काळे,श्रीरामपूर, ललितसंग्रह – मनात राहणारे ,प्रा.शशिकांत शिंदे,कोल्हार , जीवनचरित्र – बाप नावाची माय,डॉ.राजेश गायकवाड, परभणी, समिक्षाग्रंथ – खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकर चळवळ, सुनीता सावरकर, औरंगाबाद, संकीर्ण – सतारीच्या तारा,अन्थनी परेरा,वसई, बालवाड्मय – हासरी फुले,डॉ.शुभांगी गादेगावकर,ठाणे, लेखसंग्रह ¬ – स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्णरत्ने, श्री.रघुराज मेटकरी,विटा
कवयित्री प्रा.शर्मिला गोसावी,सुभाष सोनवणे,भगवान राऊत,किशोर डोंगरे,राजेंद्र फंड,ऋता ठाकूर यांनी परीक्षण केले त्यानुसार २०२० चे “ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ” जाहिर होत आहेत.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button