इतर

मंत्रालयात शिवपानंद चळवळीची सरकार सोबत यशस्वी बैठक

*महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून शिव पानंद चळवळीच्या मागण्या मान्य- शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील( शिव पानंद शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य)


पारनेर,:-शेत तिथे रस्ता गाव तिथे समद्धी या जनजागृती जनआंदोलनाच्या माध्यमातुन शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे , राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटिल यांच्या नेतृत्वाखाली खाली शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतरस्तांच्या प्रश्नावर आझाद मैदान येथे पुकारलेल्या अंदोलनाची राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेत मंत्रालय मुंबई येथील महसुलमंत्री कार्यालयात दि.२४ एप्रिलला राज्यातील संबंधित विभागांसमवेत बैठक घेतली चळवळीच्या सर्व मागण्यांसदर्भात चर्चा पार पडली यावेळी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे हेही चर्चेत सहभागी झाले होते दरम्यान विशेष कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी विशेष सहकार्य केले समवेत संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या चर्चेनंतर विविध मागण्या मान्य झाल्या.
१)राज्यातल्या सर्व रस्त्यांना नंबर देवून शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून सहा महिन्यात दगडी नंबरी लावण्यात येणार.
२) छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ६० दिवसांत राज्यातील सर्व तहसीलदारांना शेतरस्ते खुले करण्याचे आदेश दिरंगाई केल्यास तहसिलदारांना १००० रू. दंड जाहीर.
३) राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतींना हद्द निश्चित झालेले शेतरस्ते खुले करण्यासह सपाटीकरणाचे आदेश देणार.
४) शेतरस्त्यांसाठी खाजगीसह व शासकीय मोजणीसाठी पोलिस संरक्षण मोफत.
५) सर्व शेतरस्ते खुले करणाऱ्या ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार
६) वाटप पत्रात शेतरस्त्यांचा उल्लेख करूनच वाटपत्र केले जाणार
७) शेतरस्ते बंद करणाऱ्यांना होणार तातडीची शिक्षा
८) नकाशावर लांबी रुंदी नमुद करून वाजे उल बुक मध्ये रस्त्यांच्या नोंदी होणार.
९) दर ३ महिन्याला तहसिल कार्यालयावर” रस्ता अदालत” होणार.
आदी विविध विषयांवर चर्चा पार पडत शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्याचा विचार करत चळवळीसमवेत सन्मानपूर्वक बैठक घेत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा ऐतिहसिक निर्णय बैठकीत घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या वतीने सरकार प्रशासनाचे आभार मानले.
*चौकट- राज्यातील नकाशावरील शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून सहा महिन्यांत दगडी नंबरी लावुन ग्रामपंचायतींनी शेतरस्ते सपाटीकरण करून झाल्यानंतर लगेच विशिष्ट निधी मंजुर राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार शेतरस्ते करून देणार- महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button